Gadchiroli Accident News : गडचिरोलीच्या देसाईगंज (Desaiganj) तालुक्यातील चिखली गावात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. शेत पिकांच्या संरक्षणासाठी लावण्यात आलेल्या सौर ऊर्जा झटका मशीन यंत्राच्या विजेच्या धक्क्याने (Electric Shock) दोन संख्या भावांचा मृत्यू (Gadchiroli Accident News) झालाय. शेतात काम करताना विजेचा धक्का बसलेल्या भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ धावला, मात्र, त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसला आणि दोघांचाही यात दुर्दैवी अंत झालाय. या घटनेनं सर्वत्र मोठी खळबळ उडाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद बुद्धे आणि अशोक बुद्धे अशी मृत भावांची नावं आहेत. दोन्ही भाऊ शेतात कीटकनाशक फवारणीसाठी गेले होते. मात्र ते सौर ऊर्जा झटका यंत्राच्या संपर्कात आल्याने दोघांचाही जीव गेला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. शेतातील पिकांचं वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेलं झटका यंत्रच जीवघेणं ठरल्याने, शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Gondia: शेतातील गवत कापताना करंट लागून शेतमजुराचा मृत्यू; शेतकरी पिता-पुत्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी शेतशिवारात विजेच्या खांबावरून थेट बेकायदेशीर वायर जोडून शेतात विद्युतप्रवाह सोडल्यामुळे एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला आहे. मृतकाचे नाव माधवराव कापगते असे आहे..आरोपी जयदेव कुशन पुस्तोडे आणि त्यांचा मुलगा कृष्णकांत जयदेव पुस्तोडे दोघे रा. खोडशिवनी यांनी शेतातील धानाला पाणी देण्यासाठी जवळच्या विजेच्या खांबावरून थेट वायर जोडून मोटार पंप सुरू केला होता. या उघड्या वायरमुळे कोणाचाही स्पर्श होऊन जीवितहानी होऊ शकते, याची जाणीव असतानाही आरोपींनी थेट विद्युतप्रवाह सुरू ठेवला होता. दरम्यान, मृतक शेतकरी आरोपींच्या शेतात गवत कापण्यासाठी गेला असता त्याचा थेट करंट असलेल्या वायरला अचानक स्पर्श झाला. विजेचा तीव्र झटका बसल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी फिर्यादी विलास यादवराव कापगते (वय 47 वर्षे, रा. खोडशिवनी) यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी आरोपी जयदेव पुस्तोडे आणि कृष्णकांत पुस्तोडे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 च्या कलम 105 (सदोष मनुष्यवध) आणि कलम 3(5) (समान हेतू) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास डुग्गीपार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Accident News: भीषण अपघात! नागपूर-अमरावती महामार्गावर 13.5 टन बारूदचा कंटेनर रस्त्यावर पालटला, चालक जखमी, दैव बलवत्तर म्हणून...