Devendra Fadnavis On Nana Patekar Death: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Marathi Actor Nana Patekar) यांचं आज (8 ऑक्टोबर) निधन झालं आहे. वयाच्या 75 व्या वर्षी नाना पाटेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील डोना पावलामधील घरी नाना पाटेकर हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र याचवेळी नाना पाटेकर यांचा मृत्य झाला. आज सायंकाळी 5 वाजता पुण्यात नाना पाटेकर यांच्यावर अंतिमसंस्कार होणार आहेत. (Veteran Actor Nana Patekar Passes Away Marathi News)

नाना पाटेकर यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील गहिवरले. नानांच्या निधनाची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीसांनी मल्हार पाटेकर यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. तसेच नाना पाटेकर यांचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी सरकार कायम आपल्यासोबत असेल, असेही सांगितले. तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील एक कसदार कलाकार आणि अत्यंत उत्तम माणूस असलेल्या नाना पाटेकर यांचे अचानक जाणे ही एक मोठी हानी आहे. 'क्रांतीवीर' ते 'नटसम्राट' अशा विविध चित्रपटांतून त्यांनी केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही, तर त्यांना वैचारिक दृष्टीही दिली. तसेच ते एक देशभक्त म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी सीमावर्ती भागात आपल्या सैनिकांसोबत काम केले आणि 'नाम' (NAAM) फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात दुष्काळ निवारणाचे कार्य केले. विविध गावांमध्ये जलसंधारणासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने अनेकांना प्रेरणा दिली आणि त्यामुळे त्यांना लोकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नाना पाटेकर अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व- (Devendra Fadnavis On Nana Patekar Death)

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नाना पाटेकर अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते. समाजातील विविध घटकांसाठी त्यांनी आदर्शवत कार्य केले आणि आज त्यांचे अचानक जाणे आपल्या सर्वांसाठी एक मोठा धक्का आहे. वैयक्तिक पातळीवर माझे त्यांच्याशी अत्यंत जवळचे नाते होते. माझ्यासाठी ते एखाद्या भावासारखे, मार्गदर्शकासारखे आणि मित्रासारखे होते. त्यांची उणीव सर्वांनाच भासेल. आज आपण एक देशभक्त, समाजसेवक आणि अभिनेता गमावला आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

नाना पाटेकरांची अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Nana Patekar)

नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे. परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावूक, VIDEO:

संबंधित बातम्या:

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकर यांचं निधन, मृत्यूचं कारण आलं समोर; गोव्यातील घरी नेमकं काय घडलं?

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO