Devendra Fadnavis On Prasad Oak: देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दिघे...', मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, प्रसाद हात जोडून उभा राहिला!

1 month ago 5
ARTICLE AD

Devendra Fadnavis On Prasad Oak: महाराष्ट्राच्या (Maharashtra News) समृद्ध चित्रपट परंपरेचा गौरव करणारा 62वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार (Maharashtra State Film Awards) सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात (Ravindra Natya Mandir) संपन्न झाला. या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाचा गौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर (Pandit Hridaynath Mangeshkar) यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर, मराठी अभिनेता प्रसाद ओकला  (Marathi Actor Prasad Oak) चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला. त्यासोबतच, सलीम खान (Salim Khan) यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार आणि बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला (Bollywood Actress ) राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. प्रकृती अस्वस्थतेमुळे सलीम खान येऊ शकलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या पत्नी अभिनेत्री हेलन यांनी जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मान्यवरांचं अभिनंद केलं आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मराठी अभिनेते प्रसाद ओक यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठी अभिनेता प्रसाद ओकवरही स्तुतीसुमनं उधळलीत. मराठी अभिनेता प्रसाद ओक याला 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री प्रसाद ओक यानं 'धर्मवीर' सिनेमात साकारलेल्या आनंद दिघेंच्या भूमिकेबाबतही भरभरुन बोलले. विष्णुपंत पागनीस म्हणजे, संत तुकाराम... निळु फुले म्हणजे, अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दीघे..., असं देवेंद्र फडणवीस म्हणताच अभिनेता प्रसाद ओक उठून उभा राहिला आणि फडणवीसांसमोर हात जोडून नतमस्तक झाला.

प्रसाद ओकबाबत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मराठी अभिनेता प्रसाद ओकबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आपल्या सर्वांचे लाडके प्रसाद ओक, जे दिग्दर्शकही आहे, सुंदर कलावंतही आहेत... मला असं वाटतं की, कलेच्या क्षेत्रात एक प्रकारे 360 डिग्री मॅन म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, असे प्रसाद ओक आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून ते जे काम करतात, ते खरोखरंच विलक्षण प्रकारचं आहे... खरंतर विष्णुपंत पागनीस म्हणजे, संत तुकाराम... निळु फुले म्हणजे, अत्यंत इरसाल असा राजकारणी... तसंच आता, प्रसाद ओक म्हणजे, धर्मवीर आनंद दीघे... पण कदाचित पुढच्या वर्षी आम्हाला असं म्हणावं लागेल, प्रसाद ओक म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज... आपल्या भूमिकेत जीव ओतणं, ज्यांनी धर्मवीर आनंद दीघेंना पाहिलं नसेल, त्यांच्यासाठी आयुष्यभर प्रसाद ओक यांनी साकारलेली ती जी प्रतिमा आहे, ती इतकी सुंदर आहे, ती इतकी हुबेहुब आहे की, त्यांच्याकरता तेच धर्मवीर आनंद दीघे राहतील... इतकं सुंदर त्यांनी काम केलंय... आत्ताच त्यांनी सांगितलं की, 125 सिनेमे त्यांनी केलेत... पण, प्रसाद ओक तुम्ही काळजी करू नका, एवढ्या लवकर तुम्हाला जीवनगौरव दिला जाणार नाही... अजून खूप पुरस्कार तुम्हाला घ्यायचेत... त्यामुळे ही जी सेवा तुम्ही सातत्यानं या सिनेसृष्टीची करताय, ती अविरत अशाच पद्धतीनं सुरू राहिली पाहिजे..."

"आता 'देऊळ बंद' अनेक विक्रम रचतोय, त्यामुळे मराठी माणसाला आनंद वाटतो की, ज्यावेळस आपला एक मराठी सिनेमा सिनेमा 100 कोटी आणि वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम रचतोय... तुमच्या सगळ्या कारकीर्दीला मी मनापासून शुभेच्छा देतो...", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुरस्कार सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.  महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मराठी चित्रपटसृष्टीची कलात्मक गुणवत्ता जपतानाच आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त अशी चित्रनगरी विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि विविध प्रकारचे सेट्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच, मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्य : देवेंद्र फडणवीस

कलात्मक दृष्ट्या देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये मराठी चित्रपटांचा समावेश होतो, असं सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटांची वैशिष्ट्ये आहेत. देशातील सर्वोत्तम रंगभूमी म्हणून मराठी रंगभूमीकडे पाहिले जाते. मराठी कलावंतांनी रंगभूमीची परंपरा आणि प्रतिष्ठा आजही जपली आहे. याच समृद्ध परंपरेच्या बळावर मराठी चित्रपटसृष्टी सातत्यानं पुढे जात आहे.

Read Entire Article