Devendra Fadnavis: वर्धा जिल्ह्यातल्या सावंगी येथील अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या 17 व्या दीक्षांत समारंभ आज (17 ऑक्टोबर रोजी) पार पडणार आहे. या सोहळयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना 'डी. लिट.' पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (शनिवारी 17 ऑक्टोबर रोजी) सावंगी येथे होणाऱ्या अदाणी इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या (Adani Institute of Higher Education and Research) 17 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे नाव बदलल्यानंतर प्रथमच हा दीक्षांत समारंभ होत आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. प्रीती अदाणी असतील. तर या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डी लिट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. (Wardha News)

Adani Institute of Higher Education and Research: सोहळ्यात एकूण 2320 पदव्या प्रदान केल्या जाणार

दरम्यान, या सोहळ्यात एकूण 2320 पदव्या प्रदान केल्या जाणार आहे. यामध्ये 123 पीएच.डी. पदव्यांचा समावेश आहे. तसेच 123 सुवर्णपदके, सात रौप्यपदके आणि इतर 13 पुरस्कार दिले जाणार आहे. तसेच नॅशनल मेडिकल कमिशन'चे (एनएमसी) अध्यक्ष डॉ. अभिजात शेठ यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली जाणार असल्याची माहिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: शिक्षकांना कुणी धमकवलं तर थेट माझ्याकडे तक्रार करा, SIT चौकशी केली जाईल; चंद्रशेखर बावनकुळेंचा कडक शब्दात इशारा, म्हणाले, कोण कितीही मोठा असला तरी...