Devendra Fadnavis: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर येथे ध्वजारोहण (Flag Hoisting) पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारक स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण केले. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना त्यांनी अभिवादन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या इतिहासासोबतच दुष्काळ, शेतकरी, कर्जमुक्ती, पाणीप्रश्न, नदीजोड प्रकल्प आणि छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठ्याबाबत सरकारची भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या खूप शुभेच्छा. आजचा दिवस आपल्या सर्वांकरिता महत्त्वाचा दिवस आहे. 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, मात्र गुलामगिरीत होता तो झगडत संघर्ष करत होता. त्या संघर्षातून 17 सप्टेंबर 1948 रोजी म्हणजे 13 महिन्यांनंतर मराठवाड्याला मुक्ती मिळाली. भारताचा तिरंगा झेंडा मराठवाड्यात देखील फडकलेला पाहायला मिळाला. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी अनेक स्वातंत्र्य सेनानींनी बलिदान दिले. त्यावेळी मराठी बोलण्यासाठी बंदी होती. त्या काळात अत्याचाराची परिस्थिती पाहायला मिळत होती, सण साजरे करता येत नव्हते. अशा स्थितीतून मराठवाड्याला बाहेर काढण्याचे काम स्वातंत्र्य सेनानींनी केले.

Devendra Fadnavis: 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू

सर्वात जास्त दुष्काळाचे संकट मराठवाड्यात आहे. सातत्याने दुष्काळाचे चित्र घोंगावत आहे. हे वर्ष देखील दुष्काळाचे वर्ष आहे. सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की, आपले सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करू. आम्ही आतापासून सर्व तयारी सुरू केलेली आहे. 5 ऑक्टोबरनंतरचे सर्व पंचनामे करू. NDRF ची मदत तर मिळेल, त्याच्या अगोदर राज्य सरकार आपली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Devendra Fadnavis: पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, एल निनोचे संकट अगोदरच माहीत असल्यामुळे चाऱ्याची लागवड केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मराठवाड्याला होत आहे. लवकरच उर्वरित याद्या देखील येतील. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय आहे. 48 हजार कोटींची शेतकऱ्यांची कृषी वीज बिल थकबाकी रद्द करण्याचा निर्णय झाला. मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढच्या पिढीला बिलकूल पाहू द्यायचा नाही. त्या दृष्टीने सरकार वेगाने वाटचाल करत आहे. कृष्णा खोऱ्यातील पाणी मराठवाड्यात आणायचं होतं. त्याचा पहिला टप्पा मराठवाड्यात आणला, पण मोठा डबा बाकी होता. वर्ल्ड बँकेने मान्यता दिली. त्याच्यामुळे टेंडर देखील निघत आहेत. 30 TMC पाणी अतिरिक्त उपलब्ध होत आहे. ते पाणी मराठवाड्यात आणण्याचे काम सुरू करत आहोत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Devendra Fadnavis: संभाजीनगरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येतेय

गोदावरीचे खोरे तुटीचे खोरे आहे. कोकणातलं पाणी उचलून नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरी खोऱ्यापर्यंत पाणी आणण्यापर्यंत डीपीआर अंतिम टप्प्यात आहे. 70 TMC पाणी उल्हास खोऱ्यातून गोदावरीच्या खोऱ्यात आणण्यात येईल. याकरता देशातलं वेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग ड्रॉईंग तयार होत आहे. आज मला आनंद आहे की, छत्रपती संभाजीनगरचं पाणीपुरवठ्याचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. मला विश्वास आहे तो दिवस येईल, ज्या दिवशी संभाजीनगरमध्ये रोज पिण्याचे पाणी येईल. संभाजीनगरात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत आहे. त्याला अनुरूप इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहोत. जालना ड्रायफूडचे काम सुरू झाले आहे. पुढच्या काळामध्ये पूर्णपणे 100 टक्के पूर्ण होईल, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Sunetra Pawar: बीड जिल्हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचा केंद्रबिंदू ठरला : सुनेत्रा पवार

दरम्यान, बीड येथे आयोजित मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मराठवाडा मुक्तिसंग्राम म्हणजे देशातील उरलेल्या स्वातंत्र्याचा दुसरा लढा होता. आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस आहे. मी त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देते. मराठवाडा मुक्तिसंग्रामासाठी अनेकांना रक्त सांडावे लागले. मराठवाडा माझ्यासाठी इतिहासच नाही तर जिव्हाळ्याचा विषय आहे. माझे वडील बाजीराव पाटील हे मराठवाडा मुक्तिसंग्रामात सहभागी झाले होते. हा माझ्यासाठी अभिमानाचा वारसा आहे. स्वामी रामानंद तीर्थ यांनी मुक्तिसंग्रामाचे समर्थ नेतृत्व केले. संपूर्ण बीड जिल्हा मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या लढ्याचा केंद्रबिंदू ठरला, असे त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

Babanrao Taywade on Manoj Jarange Patil Protest: ना नवीन GR, ना लेखी आश्वासन, जरांगेंच्या उपोषण स्थगितीनंतर बबनराव तायवाडेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले, सरकारची भूमिका पाहता...