Dhairyasheel Mohite Patil on Jaykumar Gore: 'जलनायक' म्हणून घेता आणि मतदारसंघात 34 टँकर; धैर्यशील मोहिते पाटलांची टीका, जयकुमार गोरेंचाही पलटवार

1 month ago 3
ARTICLE AD

Dhairyasheel Mohite Patil on Jaykumar Gore: सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) हे स्वतःला 'जलनायक' म्हणून घेतात, पण त्यांच्याच मतदारसंघात 34 पाण्याचे टँकर (Water Tankers) सुरू आहेत, अशी खोचक टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (MP Dhairyasheel Mohite Patil) यांनी केली आहे. खासदार मोहिते पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात नेहमीच एकमेकांवर शेरेबाजी सुरू असते. आता सोलापूर जिल्ह्यातील भीषण दुष्काळाच्या मुद्द्यावरून खासदार मोहिते पाटील यांनी पालकमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

विविध योजनांमधून मतदारसंघात पाणी आणण्याचे दावे करणाऱ्या या 'जलनायकाने' आधी स्वतःच्या माण-खटाव (Man-Khatav) मतदारसंघाकडे लक्ष द्यावे. माढा लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक टँकर हे गोरे यांच्या माण-खटाव तालुक्यात सुरू असून, त्यांनी त्याकडे आधी लक्ष द्यावे, असा घणाघाती टोला खासदार मोहिते पाटील यांनी लगावला आहे.

Jaykumar Gore on Dhairyasheel Mohite Patil: जयकुमार गोरेंचाही पलटवार

दरम्यान, धैर्यशील मोहिते पाटील यांनी केलेल्या टीकेवर जयकुमार गोरे यांनी देखील पलटवार केलाय. जयकुमार गोरे म्हणाले की, माझ्या मतदार संघात टँकर सुरु आहेत, त्याकडे माझे लक्ष आहे. पण तुम्ही (मोहिते पाटील) देखील त्या मतदारसंघाचे आहात. तुम्ही सुद्धा कधी तरी त्या भागाचा दौरा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.

Dhairyasheel Mohite Patil: हवामान तंत्रज्ञानामध्ये भारत जगाच्या 10 वर्ष मागे

दरम्यान, हवामान तंत्रज्ञानामध्ये भारत जगाच्या दहा वर्षे मागे असून, सॅटेलाईटमार्फत हवा तेवढा डेटा गोळा होत नाही, असा गंभीर आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला आहे. पूर्वी एअर इंडिया (Air India) कंपनी शासनाच्या ताब्यात असताना विमानातून पावसाचे ढग किती आणि हवामान कसे, याची अचूक माहिती गोळा केली जायची. मात्र, आता खाजगी विमान कंपन्या हा डेटा देत नसल्याने हवामानाचा अचूक अंदाज मिळत नसल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. विमानांच्या माध्यमातून दुसऱ्या पद्धतीने हवामानाचा अचूक डेटा गोळा करता येऊ शकतो; मात्र भारतात असा कायदाच नसल्याने याही पद्धतीने अचूक अंदाज कळू शकत नाही. विमान कंपन्यांकडून जरी हवामानाचा डेटा गोळा करण्यास सुरुवात केली, तर हवामानाचा अचूक अंदाज कळेल आणि याचा खऱ्या अर्थाने फायदा देशातील नागरिकांना व बळीराजाला होईल, असे त्यांनी नमूद केले.

Dhairyasheel Mohite Patil: उजनीत 100 टक्के पाणी नाहीच, 19 टीएमसी गाळ! पाणी वाटप प्रशासनाकडे सोपवा

सोलापूर जिल्ह्यात अत्यंत भीषण दुष्काळी परिस्थिती असताना, आपण मात्र उजनी धरणात 100 टक्के पाणी आहे या विश्वासावर राहत आहोत. मात्र, वास्तव परिस्थिती वेगळीच आहे. उजनी धरणामध्ये तब्बल 19 टीएमसी (TMC) गाळ आणि वाळू साचली असल्याने या पाण्याचा मोठा तुटवडा आहे. अशा वेळी धरणात 100 टक्के पाणी आहे असे गृहीत धरून नियोजन केल्यास संपूर्ण नियोजन चुकणार असल्याचे वास्तव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मांडले.

भारत सरकारच्या सेंट्रल वॉटर कमिशनकडे याबाबत माहिती मागितली असता, 2023 मध्ये त्यांनी उजनी धरणात 19 टीएमसी गाळ असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे या 19 टीएमसी पाण्याचा तुटवडा विचारात घेऊनच पाण्याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. मात्र, धरणातील पाणी वाटपासाठी असणाऱ्या कालवा सल्लागार समितीत मोठ्या प्रमाणावर राजकारण होत असल्याने पाण्याचे नियोजन व्यवस्थित होत नाही.

अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यानुसार धरणातील संपूर्ण पाण्याचे नियोजन थेट प्रशासनाकडे देण्याची मागणी खासदार मोहिते पाटील यांनी केली आहे. गेल्या 75 वर्षांत पडला नव्हता असा भीषण दुष्काळ सध्या जाणवत असून, तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती केवळ या वर्षीच नाही तर पुढील दोन वर्षे जाणवू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करून पाण्याचे संपूर्ण नियोजन तात्काळ प्रशासनाकडे सोपवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

... तर राज्यात दुष्काळच पडला नसता; शरद पवारांचा दुष्काळी दौरा, पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री जयकुमार गोरेंची टीका

Read Entire Article