Dhiraj Deshmukh Rain: मराठवाड्यात पावसासाठी धीरज देशमुखांनी 'क्लाऊड सीडिंग'चा पर्याय सुचवला, म्हणाले, 'पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने...'

1 month ago 4
ARTICLE AD

मुंबई : ज्या ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यात श्रावणसरींचा वर्षाव होतो, तोच महिना यंदा पावसाच्या अभावाने कोरडा झाला. सलग ३१ दिवस पावसाचा पत्ता नसल्याने खरिपाची पिके माना टाकू लागली आहेत. ऐन मोक्याच्या क्षणी पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेली ही परिस्थिती थेट पीक उत्पादकतेवर गदा आणणारी ठरणार आहे. या पार्श्वभूमीवरती आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी लातूरसह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील दुष्काळसदृश भागांमध्ये क्लाऊड सिडिंग (cloud seeding) (कृत्रिम पाऊस) करण्याची मागणी सरकारकडे केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी आमदार धिरज देशमुख (Dhiraj Deshmukh) यांनी मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा (cloud seeding) प्रयोग तातडीने राबविण्यात यावा अशी मागणी केली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडे ही मागणी धिरज देशमुख यांनी केली आहे. (Dhiraj Deshmukh)

Dhiraj Deshmukh: मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल

मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी केवळ पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक पर्यायांचा तातडीने वापर करण्याची गरज आहे. हे तंत्रज्ञान हमखास पाऊस पाडेल, असा दावा नाही; मात्र योग्य हवामान आणि ढगांची परिस्थिती उपलब्ध असेल, तर हा पर्याय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच तपासून पाहिला पाहिजे.शेतकरी संकटात असताना सरकारकडे उपलब्ध असलेला प्रत्येक वैज्ञानिक पर्याय वापरला गेला पाहिजे, असंही धिरज देशमुख यांनी म्हटलं आहे.

Dhiraj Deshmukh: आपल्या भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला पाहिजे

धिरज देशमुख यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे, त्यामध्ये ते म्हणतात की, पावसाळ्याचे तीन महिने संपलेले आहेत. मराठवाड्यामध्ये समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक भागांमध्ये पिकांनी माना टाकलेल्या आहेत. लातूरच्या मांजरा धरणामध्ये देखील १३.५% पाणी साठा शिल्लक आहे. दुष्काळ शेतकऱ्यांना भेडसावतोय. अशा अडचणीच्या काळामध्ये माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी आपल्या भागामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग केला पाहिजे. अनेक भागांमध्ये आपल्या वाचण्यामध्ये आलेलं आहे की कृत्रिम पावसाच्या प्रयोगामुळे थोडाफार दिलासा शेतकऱ्यांना मिळू शकतो. आपण आपल्या हातामध्ये जी तंत्रज्ञान (Technology) आहे, याचा वापर करून आज आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय, खरं तर हे सिद्ध करण्याची वेळ आहे. उर्वरित दिवसांमध्ये जिथे कुठे ढगाळ वातावरण असेल, त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो का? मला माहिती आहे हा प्रयोग यशस्वी होईल किंवा नाही, हे आपल्याला सांगता येत नाही. पण आज काळाची गरज आहे आपण शेतकऱ्यांसाठी काय करतोय हे दाखवण्याची. आज काळाची गरज आहे, शेतकरी आभाळाकडे बघतोय पण पाऊस पडत नाहीये. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने मी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री... या सर्वांना विनंती करतो की राज्य सरकारने तातडीने असा एक निर्णय घेऊन कृत्रिम पावसाचा प्रयोग महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये राबवावा.

मराठवाड्यात क्लाऊड सीडिंगचा प्रयोग तातडीने राबविण्यात यावा अशी मागणी मी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी आणि श्रीमती सुनेत्राताई पवार जी यांच्या कडे करत आहे.

मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके वाया जाण्याच्या… pic.twitter.com/lCAptQJtda
— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) September 2, 2026

Read Entire Article