Dr. Babanrao Taywade: मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार? तिकडे ओबीसी महासंघाकडून इशारा, म्हणाले आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर...

1 month ago 5
ARTICLE AD

Dr. Babanrao Taywade : प्रशासन खरंच जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना आंदोलनाची परवानगी देणार का? यापूर्वी प्रशासनाने पोलीस यंत्रणेच्या मदतीने परवानगी बिना होणारे अनेक आंदोलन यशस्वीरित्या रोखून दाखवले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह सरकारच्या भूमिकेवर ही आमचं लक्ष असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Taywade) यांनी दिली आहे. जर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला, तर सरकार काय करते? सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation)  बाधा येते का? यावर आमचा लक्ष आहे. जर सरकारची भूमिका ओबीसी आरक्षणाला धक्का पोहोचवणारी असेल, तर आम्ही पण 60% ओबीसी बांधवांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही डॉ. तायवाडे यांनी दिला आहे. (Babanrao Taywade on OBC Reservation)

Babanrao Taywade: पोलीस आणि इतर यंत्रणेच्या मदतीने परवानगी विना होणारे आंदोलन रोखून दाखवू शकतो

जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनासंदर्भात न्यायालयाने कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही, कारण सध्या जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचे जाहीर केलेले नाही. जरांगे पाटील मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर प्रशासन त्यांना खरंच आंदोलनाची परवानगी देते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी प्रशासनाने परवानगी विना होणारे अनेक आंदोलन यशस्वीरित्या रोखून दाखवले आहे. प्रशासन पोलीस आणि इतर यंत्रणेच्या मदतीने परवानगी विना होणारे आंदोलन रोखून दाखवू शकतो, याची सूचक आठवणही तायवाडे यांनी करून दिली.

Babanrao Taywade on Laxman Hake लक्ष्मण हाके यांच्यावर झालेलं कथित हल्ला निषेधार्ह, पण...

दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर झालेलं कथित हल्ला निषेधार्ह आहे. मात्र त्या घटने संदर्भातला कुठलाही तपशील समोर आलेलं नसल्यामुळे जास्त प्रतिक्रिया देणे योग्य ठरणार नाही, असेही तायवाडे म्हणाले.

Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत हायकोर्टाने काय म्हटलं?

* मनोज जरांगे-पाटील यांना मुंबईत येण्यास रोखू शकत नाही

* गेल्यावर्षीच्या घटनांचा दाखला देऊन यावेळी त्यांना रोखता येणार नाही

* ही लोकशाही आहे,एखाद्याला उपोषण करु नको असं सांगू शकत नाही

* जरांगेंच्या आंदोलनात हस्तक्षेप करु शकत नाही

* मनोज जरांगे अजून मुंबईत कुठं आलेत, सध्या तरी तो अंदाजच आहे

* तुम्ही सांगता त्या गोष्टी कायदा आणि सुव्यवस्था राबवणाऱ्या यंत्रणांशी संबंधित

* तुमच्या कयासाच्या आधारावर आम्ही आदेश का द्यावे? आम्ही आत्ता फक्त नोटिसा देऊ शकतो

* आम्ही कोणतीही निरीक्षणं किंवा टिप्पणी आता करणार नाही

* जरांगे जबाबदार व्यक्ती आहेत, आंदोलन करणं त्यांचा मूलभूत हक्क

इतर महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde UK Visit : आधी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये फाडफाड इंग्रजीत भाषण, मग लंडनच्या रस्त्यावर एकनाथ शिंदेंनी खाल्ला वडापाव, पाहा PHOTOs

Read Entire Article