Gajanan Kale on Ameet Satam: ‘इच्छा नसतानाही सांगावे लागतेय’; मनसेकडून अमित साटमांच्या 'त्या' वक्तव्याचा खरपूस समाचार, फडणवीस कुटुंबीयांसह भाजप नेते शिकलेल्या शाळांची यादीच वाचून दाखवली

1 month ago 10
ARTICLE AD

Gajanan Kale on Ameet Satam: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते गजानन काळे (Gajanan Kale) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम (Ameet Satam) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नातवाच्या शाळेवरून अमित साटम यांनी केलेल्या टीकेनंतर मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. गजानन काळे यांनी भाजप नेत्यांची आणि त्यांच्या मुलांची ख्रिश्चन मिशनरी शाळांची थेट यादीच वाचून दाखवत अमित साटम आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे.

गजानन काळे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि श्रीकांत ठाकरे (Shrikant Thackeray) हे स्वतः इंग्रजी शाळेत शिकले, मग बाळासाहेबांच्या मराठीनिष्ठेवर शंका घेणार का, असा थेट सवाल यापूर्वीच राज ठाकरे यांनी उपस्थित केल्याची आठवण करून देत काळेंनी भाजपवर टीका केली. भाजपचा हिंदू आणि हिंदुत्वाबद्दलचा कळवळा दाखवून देताना लालकृष्ण अडवाणी हे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले, अरुण जेटली दिल्लीच्या सेंट झेव्हियर्समध्ये शिकले आणि निर्मला सीतारामन या देखील ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकल्याचे काळेंनी स्पष्ट केले. आशिष शेलारांपेक्षा आपण कसे मुंबईत जास्त चांगले काम करतोय हे दाखवण्यासाठीच हे 'भैय्या चाटम' स्टंटबाजी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Gajanan Kale on Ameet Satam: इच्छा नसतानाही सांगावे लागतेय

गजानन काळे पुढे म्हणाले की, भैय्या चाटम अमित ठाकरेंवर, राज ठाकरेंच्या नातवावर बोलतात. जे भैय्या चाटम आम्हाला बोलतात, ते स्वतः अमित साटम ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले. देवेंद्र फडणवीसांनी अमित साटमांना असे आरोप करण्यापासून थांबवले नाही म्हणून , दिवीजा देवेंद्र फडणवीस द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल या ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकल्या आणि अमृता फडणवीसही अशाच ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकल्या, असे म्हणत त्यांनी अमित साटम यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

Ameet Satam: काय म्हणाले होते अमित साटम?

दरम्यान, अमित साटम यांनी राज ठाकरेंनी आपल्या नातवाला (म्हणजे अमित ठाकरेंच्या मुलाला) बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत प्रवेश देऊन दाखवावा, आणि मग मराठीच्या मुद्द्यावर बोलावे, अशी असे आव्हान दिले होते. तसेच 'असेल हिंमत तर पोराचे ॲडमिशन घेऊन दाखवा बालमोहन शाळेत,' असे म्हणत त्यांनी अमित ठाकरेंना देखील डिवचले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ameet Satam Mumbai : स्वत: लिहलेलं भाषण विसरतो, तो पंतप्रधान मोदींचा फोटो काढायला धावतो; भाजपच्या अमित साटमांनी अमित ठाकरेंना डिवचलं

Read Entire Article