Ganesh Visarjan 2026: बाप्पाच्या विसर्जनाला गेला अन परतलाच नाही, चिमुकल्याचं पितृछत्र हरपलं; नाशिकमध्ये 23 वर्षीय संदीपचा खाणीत बुडून अंत

1 month ago 6
ARTICLE AD

Ganesh Visarjan 2026: नाशिक (Nashik) शहरातून एक दुःखद आणि सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. गणेशमूर्ती विसर्जन (Ganesh Visarjan 2026) करताना खाणीतील पाण्याचा अन् दलदलीचा अंदाज न आल्याने एका 23 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विल्होळी शिवारातील (Vilholi) एका खाणीत शुक्रवारी सायंकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ganesh Visarjan 2026: नेमकी घटना काय घडली?

संदीप शिवाजी खनपटे (वय 23) असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. संदीप हा नाशिकमधील अंबड-चुंचाळे (Ambad-Chunchale) येथील घरकुल वसाहतीत राहणारा असून, तो व्यवसायने रिक्षाचालक (Auto Rickshaw Driver) होता. शुक्रवारी (25 सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास संदीप आपल्या परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी विल्होळी शिवारात असलेल्या खाणीवर गेला होता. मूर्ती विसर्जन करत असताना खाणीतील खोल पाणी, चिखल आणि दलदलीचा त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे तो अचानक खोल पाण्यात घसरला आणि बुडू लागला.

Ganesh Visarjan 2026: अग्निशमन दलाकडून रात्रभर शोधमोहीम

संदीप पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच नाशिक तालुका पोलिस (Taluka Police) आणि अग्निशमन दलाचे (Fire Brigade) जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाकडून रबरी बोटीच्या आणि जीवरक्षकांच्या साहाय्याने शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत खाणीत शोधमोहीम (Search Operation) राबवण्यात आली. मात्र, अंधार आणि चिखलामुळे शोधकार्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास संदीपचा मृतदेह (Dead Body) पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.

Ganesh Visarjan 2026: कुटुंबाचा आधार हरपला; परिसरात हळहळ

या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत कष्टाने आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या संदीपच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. ऐन सणाच्या काळात कुटुंबातील कर्ता तरुण आणि चिमुकल्याच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्यामुळे खनपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंबड-चुंचाळे परिसरात शोककळा पसरली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: 'कोविडच्या काळात 10 लोकांत लग्न झाले, त्यांना पोरं झाली नाहीत का?' राधाकृष्ण विखेंचा थेट सवाल, कार्यकर्त्यांना हात जोडून म्हणाले...

Sujay Vikhe Patil On Nila Vikhe Patil: 'आम्ही फ्लेक्स लावले का? जाहीर सत्कार ठेवला का?' नीला विखेंच्या श्रेय लाटण्याच्या टीकेवर सुजय विखेंचा पलटवार, निलेश लंकेंनाही सुनावलं!

Read Entire Article