Beed Ganesh Visarjan 2026: राज्यभरात आज अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi0 निमित्याने लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी नो डिजे, नो डॉल्बी (DJ) चळवळ पाहायला मिळत आहे. पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सार्वजनिक गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदुषणाला विरोध करत सर्वांचे लक्ष वेधले. तर सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सभांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. परिणामी सर्वत्र पारंपरिक पद्धतीने लाडक्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जात असल्याचे चित्र असताना विसर्जन मिरवणुकीला डॉल्बी लावू द्या, या मागणीसाठी बीडमधील (Beed News) गणेश मंडळ आक्रमक झाली आहेत.

Beed Ganesh Visarjan 2026: गणपतीच्या मिरवणुकीला दोन बेस, दोन टॉप डॉल्बीची परवानगी द्या, अन्यथा....

सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सार्वजनिक सभांमध्ये होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी उच्च न्यायालयाने (High Court) अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा उत्सवांसाठी लाऊडस्पीकर (Loudspeaker) वापरण्याची परवानगी देताना संबंधित मंडळांकडून ठेव (Deposit) म्हणून तब्बल 1 लाख रुपये जमा करून घेण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. असे असताना आज होणाऱ्या गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमिवर विसर्जन मिरवणुकीला डॉल्बी लावू द्या, या मागणीसाठी बीडमधील गणेश मंडळ आक्रमक झाले आहे. परिणामी15 ते 20 गणेश मंडळांनी एकत्र येत डॉल्बीला परवानगी देण्याची मागणी लावून धरली आहे. बीडच्या हिरालाल चौकात बीड भागातील सर्व गणेश मंडळांनी एकत्र येऊन आमच्या गणपतीच्या मिरवणुकीला दोन बेस, दोन टॉप डॉल्बीची परवानगी द्या, अन्यथा आम्ही मिरवणूक काढणार नसल्याची आग्रही भूमिका घेतली आहे. डॉल्बी न लावू दिल्यास मिरवणूक न काढण्यावर गणेश मंडळ ठाम आहेत. त्यामुळे आता पोलीस प्रशासन याबाबत काय निर्णय घेतं, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Buldhana: राज्यभरात दुष्काळाचं सावट, बुलढाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा राजेशाही थाट

यंदा राज्यातील विदर्भ मराठवाडा व अनेक जिल्ह्यात पाऊस न बरसल्याने मोठ दुष्काळाच संकट समोर आलं आहे, यातच गणेशोत्सव आल्याने दुष्काळाचे सावट गणेशोत्सवावरही दिसत आहे. शहरी भाग असू द्या, किंवा ग्रामीण, अनेक मंडळांनी दुष्काळाच्या सावटाखाली गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाचा संकट बघता संपूर्ण सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,पालकमंत्री व लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर दिवस रात्र आढावा घेत आहेत. मात्र बुलढाणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना राज्यात दुष्काळच दिसत नाहीत. कधी नव्हे तो पहिल्यांदाच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी शासकीय कार्यालयाच्या आवारात गणरायाची स्थापना केली व काल मोठ्या राजेशाही थाटात बुलढाण्यातील प्रतिष्ठितांना बोलवून शासकीय कार्यालयाच्या आवारातच राजेशाही मंडपत भंडाराही दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांना शेतकऱ्यां प्रति संवेदना नाही का? असा सवाल आता उपस्थित राहत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Thane Crime News: खळबळजनक! गावगुंडाकडून पोलिस उपनिरीक्षकाची हत्या; रस्त्यावर दारु पीत असताना हटकलं म्हणून जागीच संपवलं, ठाणे हादरलं