Ganeshotsav Toll free pass : गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी  खूशखबर! टोल मोफत!

1 month ago 8
ARTICLE AD

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण आता सरकारकडून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी केली जाणार आहे. पण त्यासाठी एक पास उपलब्ध करून दिलं जाणार आहे.. तो पास कुठून घ्यायचा..जाणून घेऊयात

टोल माफी कधीपासून कधीपर्यंत असेल?
११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही टोल सूट लागू राहील.

कोणकोणत्या रस्त्यांवर ही सवलत मिळेल?

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग (NH-48)

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66)

सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि MSRDC च्या अखत्यारीतील कोकणात जाणारे सर्व रस्ते

अटल सेतू' मार्ग

टोल माफी पास कसा मिळवायचा?

टोलचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या गाडीवर एक विशेष पास किंवा स्टीकर लावावा लागेल.

या स्टीकरवर "गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन" असे लिहिलेले असेल.

या पासवर तुमचा गाडी क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केलेले असेल.

पास कुठे मिळतील? हे पास तुम्हाला स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक पोलिस चौकी आणि आर.टी.ओ. (RTO) ऑफिसमध्ये मिळतील.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे हाच पास तुमच्या परतीच्या प्रवासासाठीसुद्धा ग्राह्य धरला जाईल.

तर मित्रांनो, जर तुम्हीही या गणेशोत्सवात कोकणात आपल्या गावी जाणार असाल, तर वेळेवर आपला टोल पास नक्की घ्या आणि सुखकर व सुरक्षित प्रवास करा!

गणेशोत्सवासाठी असलेला पास

Read Entire Article