Girish Mahajan & Chhagan Bhujbal: भुजबळ साहेब, तुम्ही माझ्या कामाकडे बघा, माझ्याकडे बघू नका; गिरीश महाजनांचं वक्तव्य अन् टाळ्यांचा कडकडाट, नेमकं काय घडलं?

2 months ago 6
ARTICLE AD

Girish Mahajan & Chhagan Bhujbal: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे आज शुक्रवारी (दि. 28) नाशिक (Nashik) जिल्ह्यात दाखल झाले असून, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (MVP) दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे उभारण्यात आलेल्या कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी केलेल्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात मविप्र संस्थेच्या कार्याचा गौरव करत सांगितले की, या संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाली असून, लाखो विद्यार्थ्यांनी येथून शिक्षण घेतले आहे. तसेच सांस्कृतिक आणि सामाजिक जडणघडणीत या संस्थेचा मोठा सहभाग असून, ही संस्था अत्यंत झपाट्याने पुढे जात आहे. तुम्ही निवडणुका लढवता, मात्र निवडणुका झाल्यानंतर सर्वजण एकत्र येतात. आमच्याकडे देखील मराठा विद्या प्रसारक संस्था आहे, पण तिथे अनेक भांडणे आहेत, त्या तुलनेत तुमच्या संस्थेचे काम खूप चांगले आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र पारंपरिक शेती करून आता उपयोग नाही, तर आधुनिक शेती केली पाहिजे आणि कृषी विभागासाठी एक मोठे दालन या महाविद्यालयाच्या रूपाने तयार झाले आहे, असे त्यांनी म्हटले.

Girish Mahajan & Chhagan Bhujbal: गिरीश महाजनांचं वक्तव्य अन् टाळ्यांचा कडकडाट

गिरीश महाजन पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे हात मोकळे आहेत. शिक्षणासाठी जी मदत लागेल ती मदत ते करतील. मी पालकमंत्री म्हणून काम करतोय. तुम्ही माझ्या कामाकडे बघा. माझ्याकडे बघू नका, बरका भुजबळ साहेब..., असे त्यांनी म्हटले. गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केल्याचे पाहायला मिळाले. पुढे बोलताना महाजन म्हणाले की, मला माहिती नाही यानंतर भुजबळ साहेबांचे भाषण आहे की नाही, नाहीतर ते मला टोमणा मारतील, असे देखील त्यांनी म्हटले. यासोबतच आगामी कुंभमेळा हा तुमचा-आमचा सर्वांचा आहे, तो केवळ प्रशासकीय नसून सर्वांनी यात हातभार लावावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Devendra Fadnavis: काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले की, बहुजन हिताय, बहुजन सुखाय या तत्त्वावर संस्थेचे काम सुरू असून, अनेक थोर लोकांचे आशीर्वाद या संस्थेला लाभले आहे. 2 लाखांहून अधिक विद्यार्थी आणि 2 हजारांहून अधिक शिक्षक असणारी ही संस्था राज्यातील अग्रणी संस्था असून, नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणीत या संस्थेचा सर्वात मोठा वाटा आहे. कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी बोलावल्याबद्दल आभारी आहे. नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा असून देशाच्या द्राक्ष निर्यातीपैकी 80 टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यातून होते, असा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आमच्या डोळ्यांत वर्षातून दोनदा कांदा पाणी आणतो, पण आता कांद्याला भाव चांगला आहे, त्यामुळे या कार्यक्रमात मला कांदा भेट म्हणून मिळाला नाही, नाहीतर एखाद्या कार्यक्रमात तरी कांदा भेट मिळतोच, आता भाव जास्त आहेत तर भेट मिळाला असता तर मी घरी तरी नेला असता. मात्र आपला शेतकरी राबतो, प्रचंड मेहनत घेतो आणि उत्पादन खर्च वाढत आहे. हमीभाव वाढत्या किमतींच्या तुलनेत समाधानकारक नसतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव ठरतात असे अनेक प्रश्न शेती क्षेत्रासमोर आहेत, असेदेखील त्यांनी नमूद केले.

आणखी वाचा

Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद

Read Entire Article