Gondia Accident News: गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर (Gondia-Balaghat National Highway) भीषण अपघाताची (Accident) घटना घडली आहे. गोंदियाच्या नागरा येथे भरधाव ट्रक (Truck) आणि बोलेरो प्रवासी वाहनाची (Bolero) समोरासमोर धडक झाली. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोंदियाकडून बालाघाटच्या दिशेने एक भरधाव ट्रक जात होता. याचवेळी बालाघाटकडून गोंदियाच्या दिशेने बोलेरो प्रवासी वाहन येत होते. नागरा परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार समोरासमोर धडक झाली. दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी भीषण होती की बोलेरो वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

Gondia Accident News: 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात बोलेरोमधील 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अन्य 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Gondia Accident News: मृत आणि जखमी मध्यप्रदेशातील

या अपघातातील मृत्यू झालेले सर्व प्रवासी मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, मृत आणि जखमी प्रवाशांची अधिकृत ओळख तसेच अपघातातील नेमकी परिस्थिती याबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिक माहिती समोर येणे बाकी आहे. दरम्यान, या भीषण अपघातामुळे गोंदिया-बालाघाट महामार्गावर काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: रेल्वे ट्रॅकवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने कोयत्याने पोलीस शिपायाचा गळा चिरला; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना

Nashik Accident News: त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाताना गर्दीत धक्का लागला, खाली कोसळली अन् ST बसचं चाक अंगावरून गेलं; 17 वर्षीय युवतीचा मृत्यू, नाशिकमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना