Harshwardhan Jadhav: राज्यात दुष्काळ, पण सरकार अन् विरोधक फोटोसेशन करत फिरताय; माजी आमदाराचा हल्लाबोल, म्हणाले...

1 month ago 3
ARTICLE AD

Harshwardhan Jadhav: राज्यात दुष्काळाची (Drought) परिस्थिती निर्माण झालेली असताना शेतकरी (Farmers) आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत सरकार आणि विरोधकांकडून केवळ दौरे आणि फोटोसेशन सुरू असल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshavardhan Jadhav) यांनी केला आहे. सरकारने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा वापर करता येऊ शकतो, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव म्हणाले, "राज्यात दुष्काळ परिस्थिती आहे मात्र सरकार आणि विरोधक फोटोसेशन करत फिरत आहे. सध्या सरकारने जाहीर केलेला GR त्यात अधिकृत निर्णय संबंधित विभागांना लेखी पत्र दिले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जिल्हा नियोजनमधील निधी वापरून राज्यात शेतकरी मदत तत्काळ दिली जाऊ शकते, हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीला तात्काळ पावलं उचलावी. छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांची मी भेट घेणार आहे आणि शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करणार आहे," असे त्यांनी सांगितले.

राज्यातील मंत्र्यांच्या दौऱ्यांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. "राज्यात सध्या विरोधक आणि सरकार मधील मंत्री मोठ-मोठ्या गाड्या घेऊन ताफा फिरवत आहे. राज्यातील मंत्री दौरे करत आहे आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील असा मला विश्वास आहे." राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी आत्महत्यांचाही मुद्दा उपस्थित केला. याबाबत जाधव म्हणाले, "राज्यात शेतकरी आत्महत्या होत आहे. कारण शेतकरी भयंकर आर्थिक संकटात सापडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकार वापरून निर्णय घेऊन आज तत्काळ शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे. सरकार आज घोषणा करत आहे. मात्,  ग्राउंडवर शेतकरी अपेक्षा ठेवून आहे. सरकार ज्यांचं आहे आणि जे विरोधात आहे ज्यांनी सत्ता भोगली आहे, त्यामुळे निर्णय अपेक्षित आहे," असे त्यांनी म्हटले आहे.

Harshwardhan Jadhav: जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार

दरम्यान, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आपण छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे. जिल्हा नियोजनातील निधीचा वापर करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारकडून घोषणा होत असल्या तरी प्रत्यक्ष जमिनीवर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Harshwardhan Jadhav: शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

राज्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणे गरजेचे असल्याची भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी मांडली आहे. सरकारकडून निर्णय जाहीर केले जात असताना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि संबंधित विभागांना आवश्यक लेखी आदेश देण्यात आले आहेत का, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Nashik News: वडिलांना पोहताना पाहिलं, मुलगाही पाण्यात उतरला, दोघेही प्रवाहात वाहून गेले अन्...; नाशिकमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना

Read Entire Article