IIT Bombay Student: मोठी बातमी! पवईच्या IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल; मुंबई पोलिसांकडून एडीआर दाखल, सात महिन्यांत चौथा बळी, विद्यार्थी आक्रमक

1 month ago 7
ARTICLE AD

Mumbai Powai IIT Student : मुंबईच्या पवई आयआयटीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नामांकित पवई आयआयटी मुंबईमध्ये एका विद्यार्थ्याने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्याने शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास टोकाचा पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेनंतर आता विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज कॅम्पस परिसरात आंदोलनाचा नारा दिलाय. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) दाखल करण्यात आला असून मुंबई पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मुंबई पोलीस सध्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. साहिल वाकोडेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आल्याची माहिती आहे. तर तपासाचा भाग म्हणून पोलीस या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचीही तपासणी करत आहेत.

Mumbai Powai IIT Student : सात महिन्यांत आयआयटी मुंबई कॅम्पसमधील आत्महत्येची ही चौथी घटना

दरम्यान, या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी अजूनही कॅम्पसमध्ये आंदोलन करत आहेत, पण त्यांना बाहेर येऊ दिले जात नाहीये. आयआयटी मुंबईच्या दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने शुक्रवारी संध्याकाळी आत्महत्या केली. तो ऊर्जा विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात शिकत होता. त्या दिवशी सकाळी, परीक्षेदरम्यान तो मोबाईल फोन वापरताना पकडला गेला होता. आयआयटी मुंबईच्या म्हणण्यानुसार, त्याने चॅटजीपीटीवर प्रश्नपत्रिका अपलोड केली होती. या प्रकरणी विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 4 वाजता परीक्षा संपली, त्यानंतर विद्यार्थी त्याच्या खोलीत गेला. त्याच संध्याकाळी त्याने त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत गळफास घेतला. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मात्र सात महिन्यांत आयआयटी मुंबई कॅम्पसमधील आत्महत्येची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आता या निमित्याने उपस्थित केले जात आहे.

Powai IIT Student : 2026मध्ये आत्महत्येच्या 3 घटना

फेब्रुवारी 2026 मध्ये वसतिगृह क्रमांक 4 मधील दुसऱ्या वर्षाच्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तर जुलै 2026 नवीन सत्र सुरू होताच वसतिगृह क्रमांक 4 मध्ये एका 20 वर्षीय बी.टेक द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. 18 सप्टेंबर 2026 परीक्षेवरून झालेल्या भांडणानंतर पवई कॅम्पसमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या घटनेनंतर 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरुद्ध आंदोलन केले. संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी नंतर विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांना तणावमुक्त होण्यास मदत करण्यासाठी आयआयटी मुंबईमध्ये 'स्टुडंट वेलनेस सेंटर' (SWC) आहे. मात्र असं असताना या घटना घडल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहे.

नेमकं प्रकरण काय? (IIT Bombay Student Ended his life In Hostel)

आयआयटी मुंबईच्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या साहिल वाकोडे नावाच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी वसतिगृहातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त होत आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी आयआयटी मुंबईच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या देत जोरदार आंदोलन सुरू केले आहे. आयआयटी मुंबई मिड-सेमिस्टर परीक्षा सुरू आहेत. शुक्रवारी परीक्षेदरम्यान हा विद्यार्थी मोबाइल फोन वापरताना पकडला गेला. त्याने उत्तर शोधण्यासाठी परीक्षेची प्रश्नपत्रिका चॅटजीपीटी या एआयचा अँपवर अपलोड केल्याचे समोर आले होते. शिक्षक व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्याची चर्चा करून त्याचे सस्पेंशन केले होते. या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर विपरीत परिणाम होणार नाही, असे आश्वासनही प्रशासनाने दिले होते. त्यानंतर सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तो खोलीत मृतावस्थेत आढळला. घटनेनंतर विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारावर एकत्र येत प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनानंतर प्रशासनाने मुख्य प्रवेशद्वार बंद करून सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारल्याने अधिकच तणाव निर्माण झाला. आयआयटी प्रशासनाने घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्यार्थी मागण्यावर ठाम होते. आगामी परीक्षांवर बहिष्कार टाकू इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांनी संस्थेचे डीन आणि संचालक यांचा राजीनाम्याची मागणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Disha Salian Case: दिशा सालियनचे वडील मातोश्रीवर जाण्याच्या तयारीत, आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करण्याची मागणी

Read Entire Article