Jalgaon Accident News: जळगाव–भुसावळ महामार्गावर (Jalgaon–Bhusawal highway Accident) नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर मध्यराञी दोन ट्रकची समोरा-समोर भीषण धडक (Accident News)  झालीय. या भीषण अपघातात सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक रमेश यादव यांचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर रमेश यादव हे ट्रकच्या केबिनमध्ये तब्बल एक तास अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

Jalgaon Accident News: ट्रक केबिनमध्ये चालकाला बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न, पण...

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक क्रमांक MH 40 BG 6287 हा सोयाबीन घेऊन गुजरातहून नागपूरच्या दिशेने जात होता. रात्री अकरा वाजेच्या सुमारास नशिराबादजवळील मकरा फटाक्यांसमोर या ट्रकची समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकशी जोरदार धडक झाली. दुसरा ट्रक दीपनगर येथून राख भरून नाशिकच्या दिशेने जात असल्याची माहिती आहे. हा ट्रक मुक्तचर अली (रा. मध्य प्रदेश) चालवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या धडकेत सोयाबीन वाहतूक करणाऱ्या ट्रकचा चालक रमेश यादव केबिनमध्ये अडकले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. अखेर क्रेनच्या सहाय्याने ट्रक ओढून आणि हलवून तब्बल एक तासाच्या प्रयत्नांनंतर रमेश यादव यांना बाहेर काढण्यात यश आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

Malegaon News : पिकअप वाहनाची दुचाकीला धडक, अपघातात पती पत्नी आणि 18 वर्षीय मुलीचा मृत्यू

मालेगाव तालुक्यातील मालेगाव- कुसुंबा रोडवर टिंगरी वणपट फाट्याजवळ पिकअपने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात धाव घेतली. यात धुळे चिंचगाव येथील राहणारे राजेद्र नाना माने, त्यांची पत्नी बालाबाई व मुलगी भठाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. मयत तिघांचे मालेगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेद करण्यात आले. नांदगाव येथे कार्यक्रमासाठी गेलेले असतांना तिकडून परतत असताना हा अपघात घडला. एकाचवेळी कुटुंबातील पती - पत्नी आणि मुलीचा अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Navnath ban and Nilesh Rane: तुझी लायकी किती तू बोलतो किती! नवनाथ बन शिंदे साहेबांवर बोलताना लायकीत राहायचं: निलेश राणे