Jalgaon Amalner Family News: पती-पत्नीने दोन मुलांसह रेल्वेखाली जीवन संपवले; जळगावमधील धक्कदायक घटना

2 months ago 6
ARTICLE AD

Jalgaon Amalner Family News अमळनेर: जळगाव जिल्ह्यामधील अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील पती आणि पत्नीने आपल्या दोन मुलांसह रेल्वेखाली स्वतःला झोकून आत्महत्या केल्याची घटना (Jalgaon Amalner News) घडली. सदर घटना 27 ऑगस्ट रोजी पहाटे 4 ते 4.30 च्या दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे.

अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथील सुनील अमृत भिल, त्याची पत्नी पार्वती सुनील भिल यांनी आपल्यासोबत दुसरीला असलेला मुलगा सनी व अंगणवाडीत असलेला राज यांनासोबत घेऊन पहाटे चार वाजेच्या सुमारास घरातून गेल्याचे समजते. यानंतर सगळ्यांनी धावत्या रेल्वेत झोकून दिल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन जागीच मृत्यु झाला आहे. सदर घटनेबाबत पहाटे 4.40 वाजता रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले आहे. एकाच कुटुंबातील चौघे जण मृत झाल्याने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत आहे. आत्महत्येचे कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची चर्चा सुरू आहे. (Jalgaon Amalner Family News)

अमळनेरमधील आणखी एक धक्कादायक घटना- (Jalgaon News)

अमळनेरमधील खवशी येथील गावतळ्याकाठी राहणारे आण्णा एकनाथ तलवारे वय 32 यांचा मुलगा वीरेंद्र हा अचानक तळ्याच्या पाण्यात बुडाला. वीरेंद्र गाळात फसल्याने त्याला बाहेर पडता येत नसल्याने त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांनी पाण्यात उडी मारली. मात्र ते ही गाळात फसले आणि थोड्या वेळात त्यांचाही मृत्यू  झाला. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचे शव पाण्याबाहेर काढून विच्छेदनसाठी ग्रामीण रुग्णालयात नेले.

प्रवाहित विजेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू, भंडाऱ्यातील घटना- (Bhandara News)

भंडाऱ्याच्या आसगाव येथील हादरवणारी घटना समोर आली आहे. विद्युत प्रवाहाची वायर कटून असल्याची माहिती नसल्यानं त्याला हात लागताचं महिलेला विजेचा जबर धक्का बसला. यामुळं जीवाच्या आकांठानं त्यांनी आरडाओरड केली आणि निपचित पडल्यात. पत्नीचा आवाज येताचं त्यांना वाचविण्यासाठी पतीनं धाव घेतली. मात्र, त्यांनाही विजेचा धक्का बसला, मात्र पत्नीचा मृत्यू झाला तर तिला वाचविण्यासाठी गेलेला पती थोडक्यात बचावला. शेजाऱ्यांनी घटनास्थळ गाठून विजेचा पुरवठा बंद करून मोठी दुर्घटना टाळली. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आसगाव इथं घडली. इंदिरा घरत असं 50 वर्षीय मृत महिलेचं नावं आहे. तर, रूपचंद घरत असं थोडक्यात बचावलेल्या पतीचं नावं आहे. या घटनेनं घरत कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

Read Entire Article