Jalgaon Crime News: गणपती विसर्जन मिरवणुकीत जाण्यास वडिलांचा नकार; सहावीतील विद्यार्थ्यानं जीवनयात्रा संपवली, जळगावमध्ये मन हेलावणारी घटना

1 month ago 3
ARTICLE AD

Jalgaon Crime News: गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह आणि आनंदाचे वातावरण असतानाच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून एक दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan Procession) जाण्यास वडिलांनी नकार दिल्याने एका 12 वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेऊन टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील घुमावल गावात घडली असून परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Jalgaon Crime News: नेमकी घटना काय?

जयेश संदीप पाटील (वय 12 वर्षे, रा. घुमावळ) असे मृत बालकाचे नाव असून तो इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. गावात गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू असताना जयेशलाही विसर्जन मिरवणुकीत जायचे होते. मात्र, वडिलांनी त्याला मिरवणुकीत जाण्यास विरोध केला व घरीच थांबण्यास सांगितले. वडिलांच्या या नकाराचा जयेशला प्रचंड राग आला. याच क्षणिक रागाच्या भरात आणि हट्टापोटी त्याने राहत्या तीन मजली घराच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन गळफास लावून घेतला.

Jalgaon Crime News: गावावर शोककळा

कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मुलाच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि त्याआधी घडलेल्या घटनांचा तपास केला जात आहे. पोलिसांच्या तपासातूनच या घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशीच घराण्यातील कुलदीपक निघून गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची बातमी पसरताच संपूर्ण घुमावल गावावर शोककळा पसरली आहे.

Jalgaon Crime News: जामनेर तहसील कार्यालयातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील जामनेर तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत एका लाचखोर कर्मचाऱ्याचे पितळ उघडे पाडले आहे. शेतातील नवीन रस्ता मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात 25 हजार रुपयांची लाच घेताना महसूल सहायक प्रवीण गांगुर्डे याला 'एसीबी'च्या पथकाने रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार शेतकऱ्याला आपल्या शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता मंजूर करून हवा होता. या कामासाठी तहसील कार्यालयातील लिपिक प्रवीण गांगुर्डे याने शेतकऱ्याकडे तब्बल 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. शेतकरी लाच देण्यास इच्छुक नसल्याने त्याने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी केली असता, गांगुर्डे याने 30 हजारांऐवजी तडजोड करून 25 हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर 'एसीबी'च्या पथकाने जामनेर तहसील कार्यालय परिसरात सापळा रचला. शेतकऱ्याकडून ठरलेली 25 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना प्रवीण गांगुर्डे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडले. या अचानक झालेल्या कारवाईमुळे जामनेर तहसील कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

नाशिकमध्ये डॉक्टर डॉक्टर... डॉ.स्वाती चव्हाणची पोलीस चौकशी; मनीषा जेऊरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल

Read Entire Article