Ketan Agrawal Case: पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणाच्या (Ketan Agrawal Case) तपासाला आता मोठा वेग आला आहे. लोणावळा पोलिसांनी (Lonavala Police) या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून न्यायालयात तब्बल 5,053 पानांचे दोषारोपपत्र (Charge-sheet) दाखल केले आहे. सुरुवातीला अपघात (Accident) वाटणाऱ्या या घटनेमागे एक भयंकर षड्यंत्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्याचा खटला चालवण्यासाठी आता विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे. या प्रकरणात मयत केतनची होणारी पत्नी सिया गोयल (Sia Goyal), तिचा प्रियकर चेतन चौधरी (Chetan Chaudhari) आणि चेतनचा मित्र रितेश हांगे (Ritesh Hange) या तिघांना अटक (Arrest) करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ पासूनच या हत्येचा कट रचण्यास सुरुवात झाली होती. सुरुवातीला तिघांनी केतनला ठार न मारता फक्त गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा विचार केला होता. यासाठी परराज्यातील एका व्यक्तीशी संपर्कही झाला होता, मात्र तो पकडला गेल्यास अडचण येईल या भीती पोटी त्यांनी हा निर्णय बदलला. यामधील एक व्यक्ती या प्रकरणात साक्षीदार झालाय.

Ketan Agrawal Case: चित्रपट, पॉडकास्ट अन् चॅट जीपीटीची मदत

त्यानंतर केतनचा काटा काढण्यासाठी आरोपींनी थेट सिनेमांचा आधार घेतला. 'मर्डर' चित्रपट पाहणे, पोलिसांपासून कसे वाचायचे याविषयीचे पॉडकास्ट ऐकणे आणि अत्याधुनिक 'चॅट जीपीटी' (ChatGPT) या एआय टूल्सचा वापर करून पुरावे कसे नष्ट करायचे याचा अभ्यास करण्यात आला. यात त्यांनी मेघालयमधील प्रसिद्ध 'सोनम केस'चाही अभ्यास केल्याची माहिती समोर आली आहे.

Ketan Agrawal Case: बाली ट्रिप रद्द करण्यासाठी पासपोर्ट फाडला

6 जून रोजी केतन आणि सियाचे प्री-वेडिंग फोटोशूट (Pre-wedding Photoshoot) बाली येथे होणार होते. मात्र, बालीला जाण्यापूर्वीच केतनचा खून करायचा असा आरोपींचा प्लॅन होता. 6 जूनला जाताना सियाने खालापूरमधील एका कॅफेच्या वॉशरूममध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट फाडून फेकून दिला. पासपोर्ट नष्ट झाल्यामुळे त्यांची बाली ट्रिप रद्द झाली.

Ketan Agrawal Case: लोहगड किल्ल्याची निवड का केली?

मार्च 2025 मध्ये लोहगड किल्ल्यावरून (Lohagad Fort) एका महिलेचा खाली पडून मृत्यू झाला होता. याचाच फायदा उचलत, केतनचा अपघात झाला किंवा सेल्फी घेताना तो खाली पडला असा बनाव करता येईल, हे लक्षात घेऊन आरोपींनी लोहगडाची निवड केली. याआधी 14 जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली होती. तेथे तिने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. त्यानंतर तिने 'साप आला' असा बनावही केला, पण तरीही यश आले नाही.

Ketan Agrawal Case: 'माही' नाव अन् सरप्राईज बर्थडेचा बनाव

रितेश हांगे याने या कटात इन्स्टाग्रामवर (Instagram) 'माही' नावाचे एक बनावट अकाऊंट तयार केले. यासाठी एका ओळखीच्या मुलीचा फोटो वापरण्यात आला. 18 जून रोजी या अकाऊंटवरून केतनशी संपर्क साधण्यात आला. "मी सियाची मैत्रीण बोलत आहे, आपण सियाचा वाढदिवस साजरा करू आणि तिला सरप्राईज देऊ. तुम्ही तिला लोहगडावर घेऊन या," असे सांगून केतनला गडावर जाण्यास भाग पाडले गेले.

Ketan Agrawal Case: असा घडवून आणला भयानक शेवट

18 जून रोजी ठरल्याप्रमाणे केतन आणि सिया लोहगडावर पोहोचले. आरोपी चेतन चौधरी एक्झिट रूटने गडावर गेला आणि वरील मंदिरात जाऊन बसला. केतनचे लक्ष नसताना, अचानक सियाने त्याच्या पाठीमागून खांद्याला धक्का दिला आणि चेतनने पायाला धक्का देऊन जोरदार लाथ मारली. यामुळे केतन शेकडो फूट खोल दरीत कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

Ketan Agrawal Case: 5 हजार पानांचे पुरावे आणि 5 प्रत्यक्षदर्शी

हत्या केल्यानंतर आरोपींनी तात्काळ 'माही' नावाचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केले. मात्र, लोणावळा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स, फोटो आणि 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या आधारे या गुन्ह्याचा उलगडा केला. 5,053 पानांच्या या चार्जशीटमध्ये आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे सादर करण्यात आले आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Case: केतनचा कट रचताना रितेशलाही सांगितले होते बारकावे, सिया-चेतनच्या मित्राच्या अटकेनंतर पोलिसांचा मोठा खुलासा, लोहगड प्रकरणात चक्रावणारी माहिती