Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल प्रकरणात (Ketan Agarwal Case) पोलिसांकडून न्यायालयात चार्जशीट (Charge-Sheet) दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला अत्यंत मोठे वळण मिळाले आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांनी या हत्येप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत खळबळजनक आरोप केले आहेत. सिया गोयलचे (Siya Goyal) कुटुंब आणि मध्यस्थी करणारे मित्तल (Mittal) कुटुंब या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप विशाल अग्रवाल यांनी केला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

Ketan Agrawal Case: तीन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना पोलीस संरक्षणाची मागणी

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी चार्जशीटमध्ये महत्त्वाचा खुलासा केल्याचे समोर आले आहे. केतनला सिया गोयल आणि चेतन चौधरी (Chetan Chaudhari) या दोघांनी दरीत ढकलल्याचे तीन प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, या तीन साक्षीदारांवर सियाचे कुटुंबीय दबाव (Pressure) आणू शकतात, अशी गंभीर भीती विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या तिन्ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना तातडीने पोलीस संरक्षण (Police Protection) देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Ketan Agrawal Case: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

चार्जशीटमध्ये सिया गोयलचे आई-वडील, भाऊ आणि मध्यस्थी करणाऱ्या मित्तल कुटुंबीयांना आरोपी करण्यात आले नसेल, तर आपण थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार असल्याचे विशाल अग्रवाल यांनी म्हटले आहे. या पाच जणांबाबत आपल्याला केवळ संशय नसून त्यांच्या भूमिकेबाबत खात्री असल्याचा दावा त्यांनी केला आहे. आपण मांडत असलेल्या या अँगलनेही (Angle) पोलिसांकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.

Ketan Agrawal Case: लग्नाची माहिती लपवून लग्न जुळवल्याचा आरोप

सिया आणि चेतन चौधरी यांचे आधीच लग्न झाल्याची माहिती गोयल आणि मित्तल या दोन्ही कुटुंबीयांना होती, तरीही केतनचे लग्न सियासोबत जुळवण्यात आले. सिया या लग्नासाठी तयार नव्हती, याचीही दोन्ही कुटुंबीयांना कल्पना होती, असा दावा विशाल अग्रवाल यांनी केला आहे. या सर्व घटनाक्रमाच्या आधारे केतनच्या हत्येत गोयल आणि मित्तल कुटुंबीयांच्या भूमिकेचा तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: दारुच्या नशेत भावाचा काटा काढला, बॅगेत दोन जिवंत कबुतरं आणि दातांचे तुकडे बघून सगळेच चक्रावले, जळगावात हादरवणारी घटना

Ketan Agrawal Case: आधी अपंग करण्याचा प्लॅन, नंतर 'माही’ नावाचं फेक अकाउंट, चॅट जीपीटी अन् तो सिनेमा...; केतन अग्रवाल प्रकरणात 5,053 पानांच्या चार्जशीटमधून चक्रावणारे खुलासे