Ketan Agrawal Case: पुण्यातील गाजलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात (Ketan Agarwal Case) आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मुख्य आरोपी सिया गोयल (Sia Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) या दोघांचा 23 वर्षीय मित्र रितेश हंगे (Ritesh Hange) हा गुन्ह्याआधी तसेच गुन्ह्यानंतरही या दोघांच्या सतत संपर्कात असल्याचे पोलीस तपासात (Police Investigation) उघड झाले आहे. या गुन्ह्याची पूर्ण कल्पना असूनही ती पोलिसांपासून लपवून ठेवल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Gramin Police Station) रितेशविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे.

Ketan Agrawal Case: फॉरेन्सिक तपास आणि तांत्रिक पुराव्यांतून मोठा खुलासा

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, फॉरेन्सिक विश्लेषण, तांत्रिक पुरावे आणि डेटा विश्लेषणाच्या आधारे रितेशविरुद्ध भक्कम पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सिया, चेतन आणि रितेश यांच्यात झालेले आणि नंतर डिलीट करण्यात आलेले मेसेज आणि चॅटिंग पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने पुन्हा रिकव्हर केले आहे. या संभाषणावरून रितेशला हत्येच्या घटनेपूर्वीच पूर्ण माहिती असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच गुन्हा घडल्यानंतर चेतनने स्वतः रितेशची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याला हत्येची माहिती दिली होती. त्यामुळे गुन्ह्याची माहिती लपवण्यासोबतच, या संपूर्ण कटात रितेशचा प्रत्यक्ष सहभाग कितपत होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

Ketan Agrawal Case: संदीपसिंह गिल यांचा खुलासा

पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल म्हणाले, "जेव्हा चेतन आणि सिया यांनी केतनला आपल्या आयुष्यातून कायमचे दूर करण्याचा कट रचला, तेव्हा त्यांनी रितेश हंगे याच्याशी सविस्तर चर्चा केली होती. एका विशिष्ट चर्चेदरम्यान केतनला शारीरिक इजा पोहोचवण्याचा निर्णय घेण्यात आला. हत्येचे नियोजन करताना अगदी बारकावे रितेशला सांगितले जात होते. रितेश त्यांना सतत पाठिंबा देत होता आणि हा कट प्रत्यक्षात आणण्याच्या योजनेत तो एक सक्रिय सहभागी होता," असे त्यांनी सांगितले.

Ketan Agrawal Case: घटनेवेळी रितेश लोहगडावर होता का?

गुन्हा घडला त्या वेळी रितेश प्रत्यक्ष लोहगड किल्ल्यावर उपस्थित होता का, याचाही पोलीस बारकाईने तपास करत आहेत. याप्रकरणी किल्ल्यावर उपस्थित असलेल्या काही प्रत्यक्षदर्शींचे जबाब पोलिसांनी नोंदवले आहेत. चेतन आणि रितेश हे दोघे महाविद्यालयीन काळापासून एकमेकांच्या संपर्कात होते. विविध व्यक्तींच्या जबाबातून आणि तांत्रिक पुराव्यांतून रितेशचे नाव समोर आल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. आरोपींकडून अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळत असली तरी तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस तपास वेगाने पुढे नेत आहेत. रितेश हंगे हा सध्या एका खाजगी बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरी करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ketan Agrawal Case : सिया गोयलला कारागृहात VIP ट्रीटमेंट?; रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाकडून संशय व्यक्त, उच्चस्तरीय चौकशीची मागणी