Kolhapur Firing News : कोल्हापूर हादरलं! जयसिंगपूरच्या दानोळीत दिवसाढवळ्या गोळीबार; सराईत गुन्हेगार महेश दळवी जागीच गतप्राण

1 week ago 2
ARTICLE AD

Kolhapur Firing News : कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. जयसिंगपूरच्या दानोळी गावात  सराईत गुन्हेगार महेश दळवी (Mahesh Dalvi) यांच्यावर गोळीबार (Kolhapur Crime News) करण्यात आला आहे. या गोळीबाराच्या घटनेत महेश दळवी यांनी गोळी लागून त्यांचा मृत्यू झालाय. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडल्याची माहिती आहे. तर दानोळी गावात दिवसाढवळ्या घडलेल्या एका थरारक (Crime News) घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरून गेलाय. महेश दळवी यांच्यावर काही अज्ञातांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. तर गोळीबाराच्या घटनेने परिसरात मोठी दहशत पसरली असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कारवाई सुरु केली आहे. मात्र हा गोळीबार नेमका कोणी आणि कुठल्या कारणातून करण्यात आला, हे अद्याप कळू शकलेलं नाही. (Kolhapur Firing News)

Kolhapur Firing News: 'कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?' नागरिकांमधून सवाल उपस्थित

दरम्यान, गेल्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. अशातच नुकतंच माणगावमध्ये एका 13 वर्षीय चिमुकलीची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना घडून काही तासांचा अवधी होत नाही तोच आता जयसिंगपूरमध्ये महेश दळवी यांच्या हत्येची घटना समोर आली आहे. सलग घडणाऱ्या गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे 'कोल्हापूर जिल्ह्यात नेमकं चाललंय तरी काय?' असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पोलिसांना आता कायद्याचा धाक दाखवत आरोपींच्या मुसक्या आवळणे महत्वाचं ठरणार आहे.

Nashik Crime News: गोळीबारात युवक बचावला मात्र आरोपी अद्यापही फरार

दुसरीकडे, नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये देखील एका युवकावर गोळीबार झाल्याची घटना घडली. या गोळीबारात उमेश मालोदे हे बचावले असून आडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने पोलिसांकडून दोन पथके आरोपींच्या मार्गावर पाठवले आहेत. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून महेश मालोदे यांच्यावर प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज हा वर्तवण्यात आला आहे. मात्र घटनेला 24 तास उलटत असताना देखील आरोपींना जेलबंद करण्यात नाशिक पोलिसांना अपयश आले आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली असून शहरातल्या ग्रामीण भागाच्या हद्दीत दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडल्याने शहरात पुन्हा गुन्हेगारी फोफावत आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात आडगाव पोलिसांकडून तपास सुरू असून आरोपींच्या अटकेनंतर या गोळीबाराच्या घटनेचा उलगडा होणार आहे.

Tiger Shroff Car Attack: टायगर श्रॉफवर गोळी झाडणारा निघाला मुंबईतील रॅपिडो चालक, तीन हल्लेखोरांची नावं समोर, दोन कोवळी पोरं

Read Entire Article