<p><strong>Mahabaleshwar Tourist News: महाबळेश्वरमध्ये सध्या निसर्गाचं मनमोहक रूप पाहायला मिळत आहे. संपूर्ण महाबळेश्वर परिसरावर धुक्याची चादर पसरली असून, डोंगररांगा अक्षरशः धुक्यात हरवून गेल्या आहेत.महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचं सौंदर्य पावसाळ्यात आणखीनच खुलून आलं आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर पसरलेली हिरवाई, त्यात पडणारा पाऊस आणि दाट धुकं... यामुळे महाबळेश्वरचा नजारा पर्यटकांना अक्षरशः भुरळ घालत आहे.हा निसर्गाचा अद्भुत अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक महाबळेश्वरकडे दाखल होत आहेत. थंडी, धुकं आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलं आता महाबळेश्वरकडे वळू लागली आहेत.धुक्याने लपेटलेला सह्याद्री...आणि हिरवाईने नटलेलं महाबळेश्वर...सध्या पर्यटकांसाठी महाबळेश्वर निसर्गाचं स्वर्गीय डेस्टिनेशन ठरतंय. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेले पर्यटक काय म्हणाले, जाणून घ्या.. (Mahabaleshwar Tourist News)</strong></p>