Maharashtra Cabinet Meeting: उद्या पार पडणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Meeting) बैठकीत जोरदार 'नाराजी नाट्य' रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सातत्याने होणाऱ्या घणाघाती वक्तव्यांमुळे सरकारमधील काही मंत्री तीव्र नाराज आहेत. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याबाबत शिवसेनेच्या काही मंत्र्यांमध्येही नाराजी असल्याची माहिती मिळत आहे. या दोन प्रमुख मुद्द्यांवरून उद्याच्या बैठकीत घमासान होण्याची शक्यता वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांवर सरकारमधील काही मंत्री नाराज

मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या भूमिकेवर आणि थेट मंत्र्यांवर सरसकट खालच्या स्तरावर जाऊन टीका करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघात करत आहेत. यामुळे समाजासमोर सरकारची प्रतिमा अत्यंत मलिन होत असल्याची भावना अनेक मंत्र्यांनी व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्याशी योग्य आणि थेट समन्वय राहावा, यासाठी सरकारने आणखी प्रयत्न करावेत, असा सूर काही मंत्र्यांमध्ये उमटत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Devendra Fadnavis: रिक्षा-टॅक्सी निर्णयावरून शिवसेना मंत्र्यांमध्ये नाराजी

दुसरीकडे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचा रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवला. देवेंद्र फडणवीसांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा टॅक्सीचालकांना एक वर्षांची मुदतवाढ दिली आहे. रिक्षा टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ती मागणी मान्य करून देवेंद्र फडणवीसांनी एक वर्षांची मुदतवाढ दिली. या निर्णयामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये अंतर्गत नाराजी पसरली आहे. ऐनवेळी निर्णय बदलल्यामुळे जनसामान्यांमध्ये, विशेषतः भूमिपुत्र आणि मराठी माणसांमध्ये अत्यंत चुकीचा संदेश गेल्याची भावना या मंत्र्यांची आहे.

Maharashtra Cabinet Meeting: कॅबिनेट बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा होणार?

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संबंधित सरकारचा समन्वय आणि रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी मुदतवाढीचा निर्णय, हे दोन मुद्दे उद्याच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नाराजीनाट्य रंगणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Manoj Jarange Protest : फडणवीस हे मराठाद्वेष्टे, प्रत्येकवेळी GR काढून जरांगेंचा विश्वासघात केला; भास्कर जाधवांचा हल्लाबोल