Maharashtra CET Exams: सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती अन् दिशाभूल करणाऱ्यांनो सावधान; CET कक्षाबाबत खोटी माहिती पसरवल्यास थेट कारवाईचा बडगा, टास्क फोर्स ठेवणार लक्ष

1 week ago 3
ARTICLE AD

Maharashtra CET Exam मुंबई : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वतीने विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा व प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. अलीकडच्या काळात सीईटी कक्षाच्या प्रवेश परीक्षा, वेळापत्रक, परीक्षेचे निकाल व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाबाबत अनेकदा दिशाभूल करणारी, अपूर्ण, असत्य माहिती/ दावे प्रसिद्ध केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारच्या कृत्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होते. तसेच सीईटी कक्षाच्या प्रतिमेस बाधा होत असते. यावर सीईटी कक्ष देखरेख ठेऊन चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या एक्स, फेसबुक, यूट्यूब व व्हॉट्सॲप या सोशल मीडियातील अकाऊंटकर्त्यावर आता कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय सीईटी कक्षाने घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे चुकीची माहिती व दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर आता सीईटी कक्ष थेट कायदेशीर कारवाई करणार असल्याचं समोर आलं आहे.

Cet Task Force Action : टास्क फोर्स ठेवणार लक्ष, तक्रारीची सत्यता पडताळून होणार कायदेशीर कारवाई

सीईटी कक्षाने सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी व चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या सोशल मीडियावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. विद्यार्थी व पालक यांनाही आवाहन करण्यात येते की सोशल मीडियावर सीईटीच्या संबंधित काही चुकीची माहिती/पोस्ट, रील, पॉडकास्ट, व्हिडीओ व आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास तसेच परीक्षा केंद्रे बदलून देण्याचा दावा करणे,पर्सेंटाइल गुण वाढवून देण्याचा दावा करणे, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील तक्रारी असतील तर [email protected] याच ईमेलवर पाठवून द्याव्यात. या तक्रारीची सीईटी कक्ष सत्यता पडताळून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Maharashtra CET Exams Acctions: एका युट्यूबरला नोटीस

डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर शिवा नामक युट्यूबरने एमएचटी सीईटी २०२७ च्या दोन्ही परीक्षेच्या तारखा, त्याच्या अर्ज नोंदणी करण्याच्या तारखा, निकालाच्या तारखा पॉडकास्ट करून जाहीर करण्यात आल्या होत्या, यामुळे विद्यार्थी व पालकात संभ्रम निर्माण झाला होता. याबाबतच्या तक्रारी सीईटी कक्षाकडे प्राप्त झाल्या होत्या. अजून सीईटी कक्षाने २०२७ च्या प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या नाहीत. यामुळे डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलला एक कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. व सदरचा व्हिडीओ यूट्यूबवरून तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच डिजिटल मास्टर या यूट्यूब चॅनेलवर याचे स्पष्टीकरण प्रसारित करण्यात यावे व याबाबतचे लेखी स्पष्टीकरण पुराव्यासह सीईटी कक्षाकडे सादर करण्याचे निर्देश या कायदेशीर नोटीसमध्ये देण्यात आले आहेत. तसेच या कायदेशीर नोटीसची प्रत गुगल इंडियाच्या दिल्ली व मुंबईच्या कार्यालयालाही पाठविण्यात आली आहे.

Satara Road Accident: ट्रकच्या धडकेने स्कॉर्पिओचा चेंदामेंदा, सीटवर रक्ताचा सडा, साताऱ्यातील अपघाताचे भयानक फोटो

Read Entire Article