Maharashtra Drought: कुंभमेळा अन् इतर प्रकल्पांचा खर्च कमी करा, शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; अमोल मिटकरींच्या सरकारकडे मोठ्या मागण्या; काय-काय म्हणाले?

1 month ago 7
ARTICLE AD

Maharashtra Drought: महाराष्ट्र सरकारने (State Government) राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यांमध्ये अधिकृतपणे दुष्काळ (Drought) जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर आता दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Farmers) प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी राजकीय वर्तुळातून मागण्या जोर धरू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी सरकारचे अभिनंदन करत दुष्काळ निवारणासाठी इतर प्रकल्पांचा व कुंभमेळ्याचा (Kumbh Mela) खर्च कमी करून तो निधी थेट शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरण्याची आक्रमक मागणी केली आहे.

Maharashtra Drought: "कुंभमेळा अन् इतर प्रकल्पांचा खर्च कमी करा"

राज्य सरकारने 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केल्याचे स्वागत करतानाच आमदार मिटकरी म्हणाले की, केवळ कागदावर दुष्काळ जाहीर करून भागणार नाही, तर प्रशासनाचा एककलमी कार्यक्रम हा “शेतकरी हिताचा” असावा. आगामी कुंभमेळा किंवा इतर मोठ्या प्रकल्पांचा खर्च कमी करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

Amol Mitkari: आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रमुख मागण्या

दुष्काळ जाहीर केलेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांत भरीव आर्थिक मदत जमा करावी.

हेक्टरी मदतीची मर्यादा व अटी शिथिल करून किंवा काढून सरसकट सर्व पात्र शेतकऱ्यांना मदत द्यावी.

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विशेष मदत द्यावी. दुबार पेरणीमुळे उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, या वाढीव खर्चाचा विचार करून स्वतंत्र मदतीची तरतूद करावी.

जनावरांसाठी पुरेसा व मोफत/अनुदानित चारा उपलब्ध करून द्यावा.

दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा. आवश्यकतेनुसार टँकर व इतर उपाययोजना सुरू कराव्यात.

आगामी रब्बी हंगामासाठी मोफत किंवा मोठ्या अनुदानावर बियाणे व खते उपलब्ध करून द्यावीत.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज उपलब्ध करून देऊन कर्जवाटप सुलभ करावे.

शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करावी. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील खासगी शाळा व खासगी कोचिंग क्लासेसच्या शुल्काबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा.

दुष्काळ निवारणासाठी निधीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. आवश्यक असल्यास अन्य खर्चांमध्ये कपात करून शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी.

दुष्काळ जाहीर करण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचवण्याची जलद कार्यवाही करावी.

आता शासनाचा एककलमी कार्यक्रम असावा — “शेतकरी हिताचा!”

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Maharashtra Drought: राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळाची घोषणा, ट्रिगर वन लागू, सर्वाधिक दुष्काळी तालुके कोणत्या जिल्ह्यात, वाचा सविस्तर यादी

Read Entire Article