Maharashtra Drought: पावसानं दांडी मारल्यामुळं भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः तुमसर तालुक्यातील काही गावांमध्ये भर पावसाळ्यातचं पाणीटंचाईचं सावट गडद झालं आहे. पावसाअभावी उभी भातपीक करपून गेली असून, किडीच्या प्रादुर्भावामुळं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. परिणामी "कोरोनापेक्षाही भयावह परिस्थिती येत्या काळात जलसंकटाची निर्माण होईल," अशी भीती व्यक्त करत हतबल झालेला शेतकरी आता शासनाकडून मदतीची चातकासारखी वाट पाहत आहे. तर दुष्काळाची भीषण दाहकता मांडताना भंडाऱ्यातील बळीराजाला अश्रू अनावर झाल्याचे बघयला मिळाले आहे. (Bhandara Drought)

Bhandara Farmer : दुष्काळी परिस्थिती आणि किडींच्या प्रादुर्भावाचा दुहेरी मारा, पाच एकरात पाच दाणेही मिळणार नाहीत,

दरम्यान, तुमसर तालुक्यातील अनेक गावांमध्ये खरीप हंगामाच्या ऐन मध्यातचं जलसाठ्याची अत्यंत गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भातपिकाच्या उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. अनेक ठिकाणी पिकाला लोंबीसुद्धा भरलेली नाही. त्यातच दुष्काळी परिस्थिती आणि किडींच्या प्रादुर्भावानं दुहेरी मारा केला आहे. अनेक शेतकऱ्यांचे पाच-पाच एकरातील भातपीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, "पाच एकरात पाच दाणेही मिळणार नाहीत," अशी विदारक स्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळाचा फटका केवळ भात उत्पादकांनाचं नाही, तर बागायतदार शेतकऱ्यांनाही बसला आहे. पावसाळ्यात भाजीपाला उत्पादन जसेतसे घेतले गेले. मात्र, पाणीच शिल्लक नसल्यानं पुढील हंगामातील पिकं कशी घ्यावीत, या विचारानं शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळं शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट कोसळलं असून कुटुंबीयांचं संगोपन कसं करायचं, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा; शासकीय धान खरेदीचे आदेश निघाले

यावर्षी ऑक्टोबर महिना अर्धा संपला तरी शासकीय धान खरेदी सुरु न झाल्याने शेतकरी संकटात आले होते. हलका धान बाजार पेठेत विक्रीस येण्यास सुरुवात झाली मात्र खरेदी केंद्राचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांना अल्प दराने खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करावी लागत होती. शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर शासनाने अखेर धान खरेदी केंद्राचे आदेश काढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासन जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रांवरून हमीभावाने धान खरेदी करते. यामुळे शेतकऱ्यांना हमखास हमीभाव मिळण्याची हमी असते.

गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी खरीप हंगामात हलक्या आणि जड धानाची लागवड करतात. हलका धान हा दिवाळीपूर्वी निघत असल्याने शेतकरी या धानाची विक्री करुन उधारउसनवारी व दिवाळ सण साजरा करीत असतात. मात्र यंदा बाजारपेठेत हलके धान विक्रीस येण्यास सुरुवात झाली तरी शासकीय धान खरेदी केंद्र सुरु झाले नव्हते. तर दुसरीकडे खासगी व्यापारी शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत कमी दराने धान खरेदी करीत होते. शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर अखेर शासनाने धान खरेदीचे आदेश काढले असून सोमवारपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!