Maharashtra Drought: दुष्काळाची दाहकता! बुलढाणा जिल्ह्यासह राज्यात तातडीने कृत्रिम पावसाच्या प्रयोग राबवा; केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

1 month ago 9
ARTICLE AD

Maharashtra Drought: राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने मोठी विश्रांती घेतली असून त्याचा थेट फटका आता बळीराज्याला बसतो आहे. अशातच मराठवाड्यावर महाभयंकर दुष्काळाचे (Marathwada Drought) संकट घोंगावत आहे. धाराशिव जिल्ह्यातही लाखो हेक्टरवर पेरणी केलेलं सोयाबीन अक्षरशः करपून गेलं आहे. तर उर्वरित राज्यात देखील आता दुष्काळाची दाहकता आता समोर येऊ लागली आहे.

दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील पावसाने दडी मारलेल्या भागांत अनुकूल हवामान असल्यास कृत्रिम पर्जन्य अर्थात ‘क्लाउड सीडिंग’चा प्रयोग तातडीने राबवावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे. केली आहे. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठवत या संदर्भात मागणी केली आहे. (Prataprao Jadhav on Maharashtra Drought)

शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा,

बुलडाणा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण सामान्यापेक्षा सुमारे 87 टक्के कमी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. पावसाअभावी खरीप पिकांवर संकट निर्माण झाले असून, शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता IMD, IITM आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम पर्जन्य प्रयोगाची तांत्रिक व्यवहार्यता तपासून निर्णय घ्यावा, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.

Kharif Crops Crisis: खरिपाची पीक धोक्यात, बळीराजा दुहेरी संकटात

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानवाडी परिसरात पावसाने महिन्याभरा पासून ओढ दिल्याने खरिपाची पीक धोक्यात आले आहेत. यामध्ये सर्वाधिक धोका सोयाबीन पिकांवर दिसतोय. आता पिके करपण्यास सुरवात झालीय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता उभ्या पिकांचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आलीय. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनची पाने पिवळी पडली असून कळ्या आणि शेंगा गळू लागल्या आहेत. तर झाड आत पूर्णतः सुकून गेलीय. हळदीची वाढ खुंटली आहे, तर तूर आणि कपाशीची पिकेही पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत. त्यामुळे पिके हातातून जाण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे अमानवाडी सह जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.

Parbhani News :परभणीच्या जिंतूर तालुक्यात मेंढपाळावर मोठे संकट, एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट

परभणीच्या जिंतूर तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मेंढपाळाच्या कळपातील तब्बल 44 मेंढ्यांचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अचानक झालेल्या या मृत्यूमुळे मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त मेंढपाळाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेची माहिती कळताच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली असून मृत पडलेल्या मेंढ्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. आता त्याचा अहवाल आल्यानंतर या मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वडाळी येथे मेंढपाळ पुनाजी येळे हे आपल्या कुटुंबासह जवळपास 300हून अधिक मेंढ्या घेवून मुक्कामास होते. यावेळी त्यांच्या एक एक करून तब्बल 44 मेंढ्या अचानकपणे दगावल्या. नेमक दूषित चारा, विषबाधा,संसर्गजन्य आजार यापैकी कोणत्या कारणाने दगावल्या, हे मात्र स्पष्ट झाले नाही. परंतु अचानकपणे एवढ्या मेंढ्या दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar: मराठवाड्यात महाभयंकर दुष्काळाची दाहकता, सगळीकडे भयाण परिस्थिती; भरीव मदत केली तरच शेतकरी वाचेल, अन्यथा...; खासदार ओमराजेंचं सरकारला साकडं!

Read Entire Article