जळगाव : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळाबाबतच्या परिपत्रकावरून विरोधी पक्षांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. सरकारने पुन्हा एकदा अटी व शर्ती लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या निर्णयाचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किंचितही फायदा होणार नाही, अशी घणाघाती टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. सरकारने शब्द गोल गोल न फिरवता 259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती आर्थिक मदत मिळणार, हे स्पष्ट करावे असा थेट प्रश्न रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारला विचारला आहे.

Rohini Khadse On Drought : 'कर्जमाफी नाहीच, हेक्टरी 50 हजारांचा उल्लेखही नाही'

रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरकारच्या दुष्काळ निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. त्या म्हणाल्या की, "2024 च्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी सातबारा कोरा करण्याचे आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अटी व शर्तींमुळे निम्म्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाला नाही. आताच्या दुष्काळ जीआरमध्येही हीच गत झाली आहे."

जीआरमधील त्रुटींवर बोट ठेवताना त्यांनी खालील मुद्दे उपस्थित केले,

शासकीय जीआरमध्ये कर्ज पुनर्गठनाचा उल्लेख आहे, म्हणजे प्रत्यक्षात कोणतीही कर्जमाफी दिलेली नाही.

33.5 % वीजबिल सवलत म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारा संपूर्ण दिलासा नाही.

शेतकऱ्यांकडून हेक्टरी 50,000 रुपये मदतीची मागणी असताना जीआरमध्ये याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.

Rohini Khadse Questions To CM : रोहिणी खडसेंचे सरकारला 5 थेट सवाल

रोहिणी खडसे यांनी सरकारला गोल गोल न फिरवता खालील मुद्द्यांवर तात्काळ स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे,

259 दुष्काळग्रस्त तालुक्यांतील किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आर्थिक मदत मिळणार?

मदतीसाठी शासनाकडून किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे?

शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी (DBT) द्वारे रक्कम कधी जमा होणार?

'ट्रिगर-2' (Trigger 2) चे मूल्यांकन कधी पूर्ण केले जाणार?

शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळण्यासाठी आणखी किती काळ वाट पाहावी लागणार?

आज राज्यावर दुष्काळाचे मोठे संकट समोर असताना, शेतकऱ्यांचे आयुष्य पणाला लागले असताना कुठल्याही अटी आणि शर्तींशिवाय दुष्काळाची घोषणा होईल असे वाटले होते मात्र सरकारने नेहमी प्रमाणे निकष, नियम, अटी आणि शर्ती लावून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे.

२०२४ विधानसभा निवडणुकीच्या… pic.twitter.com/XQAANQTpxj

— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) September 26, 2026

Rohini Khadse On Farmer : 'सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये'

गेल्या 3 महिन्यांत सुमारे 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर आकडेवारी मांडत रोहिणी खडसे यांनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले. "मागील 2 वर्षांत अनेक शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. सरकारला आणखी किती शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत? सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये," असा इशारा त्यांनी दिला.

तसेच, शरद पवार यांनी केलेल्या मागणीनुसार सरकारने सर्व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करावी आणि विद्यार्थ्यांचे केवळ परीक्षा शुल्क माफ न करता संपूर्ण वर्षाची फी माफ करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ही बातमी वाचा:

Maharashtra Drought : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ट्रिगर 1 दुष्काळ म्हणजे नेमकं काय? त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी काय मदत होणार?