Maharashtra Drought : सरकारकडून दुष्काळ जाहीर, पण प्रत्यक्षात मदत द्यायला वेळ लागणार; राज्याच्या मंत्र्याचे वक्तव्य, विरोधकांची टीका

1 month ago 6
ARTICLE AD

मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये म्हणजेच 75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. मात्र, या निर्णयानंतर प्रत्यक्ष मदत मिळण्यास वेळ लागणार असल्याचे वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी परभणी येथे केल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या वक्तव्यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दुसरीकडे, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, नुकसानभरपाईचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सरकार दिवाळीपूर्वी डीबीटी (DBT) द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट आर्थिक मदत जमा करण्याचे नियोजन करत आहे.

Minister Babasaheb Patil On Drought : सहकार मंत्र्यांचे वक्तव्य काय?

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी परभणीतील पाथरी येथे बोलताना सांगितले की, "राज्यात याआधी कधीही पाहिला नाही असा भीषण दुष्काळ यंदा आहे. विद्यार्थ्यांची फी, टँकरची मागणी, वीज बिल यासह सर्व प्रकारची मदत केली जाईल. एकही शेतकरी वंचित राहणार नाही, मात्र प्रत्यक्ष मदत वितरणात काही तांत्रिक अडचणी असल्याने थोडा वेळ लागेल."

या वक्तव्यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कडक शब्दांत टीका केली. "मंत्री मदत उशिरा मिळेल असे म्हणत असतील तर ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. सॅटेलाइटमधून शेतकऱ्यांच्या वेदना दिसणार नाहीत, त्यामुळे कागदी उपाययोजना न करता तातडीने प्रत्यक्ष मदत द्या," अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Taluka Wise Drought List : कोणत्या विभागात किती तालुक्यांचा समावेश?

'ट्रिगर-1' लागू झालेल्या 265 तालुक्यांची महसूल विभागनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे,

छत्रपती संभाजीनगर विभाग : सर्वाधिक 74 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. यात जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश आहे.

अमरावती विभाग : बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतील एकूण 56 तालुक्यांचा समावेश आहे.

नाशिक विभाग : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील 49 तालुक्यांचा समावेश आहे.

नागपूर विभाग : वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 39 तालुक्यांचा समावेश आहे.

पुणे विभाग : पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील 35 तालुक्यांचा समावेश आहे.

ठाणे महसूल विभाग : एकूण 12 तालुक्यांचा समावेश असून, यामध्ये रायगड (श्रीवर्धन), रत्नागिरी (रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर) आणि सिंधुदुर्ग (सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली, कुडाळ, वैभववाडी, मालवण, देवगड, वेंगुर्ला) यांचा समावेश आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यांतील एकाही तालुक्याचा यात समावेश नाही.

Maharashtra Drought Relief Measures : काय आहेत दुष्काळातील 12 उपाययोजना?

सरकारकडून दुष्काळी भागात 12 प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये खालील प्रमुख उपाययोजनांचा समावेश आहे,

पिण्याच्या पाण्यासाठी तातडीने टँकरची व्यवस्था करणे.

जनावरांसाठी चारा छावण्या उभारणे आणि चारा पोहोचवणे.

शेतकऱ्यांचे वीज बिल आणि शैक्षणिक फी माफ करणे.

'मनरेगा' अंतर्गत रोहयोची कामे उपलब्ध करून देणे.

डीबीटी (DBT) द्वारे नुकसानभरपाईचा निधी थेट शेतकरी खात्यात वर्ग करणे.

ही बातमी वाचा:

Maharashtra Drought : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर, ट्रिगर 1 दुष्काळ म्हणजे नेमकं काय? त्यामुळे शेतकऱ्यांना नेमकी काय मदत होणार?

Read Entire Article