Maharashtra FDA Actions News: दिवाळीपूर्वी FDAची राज्यभर ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ धडक मोहीम, 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करत 16.92 कोटींचा मुद्देमाल जप्त, 20 आरोपींनाही अटक

6 days ago 3
ARTICLE AD

Maharashtra FDA Actions News:  राज्यात सध्या एफडीएच्या कारवाईचं धाडसत्र सुरुच असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढेंच्या (Tukaram mundhe) निर्देशान्वये भेसळयुक्त आणि अनियमितता आढळून आल्यास परवाने निलंबनाची देखील कारवाई होत आहे. अशातच आगामी दिवाळी आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात एफडीएने ‘फेस्टिव्ह क्रॅकडाउन’ मोहीम (Festive Crackdown Campaign)राबवत धडक कारवाई सुरु केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या नवरात्रोत्सवात FDA ने राज्यभर धडक मोहीम राबवली असून यात 9.11 कोटींचा निकृष्ट, भेसळयुक्त अन्नसाठा अन्न व औषध प्रशासन विभागाने या काळात जप्त केला आहे. तर नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. (Maharashtra FDA Actions Marathi News)

FDA Acctions : 68 आस्थापनांचे परवाने निलंबित, 22 गुन्हे दाखल करत 20 आरोपींनाही अटक

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये 4.19 कोटींचा अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. तर राज्यात 3.15 कोटींचा गुटखा, पानमसाला आणि तंबाखू देखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यात 68 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले असून 7 बंद करण्याचे निर्देश अन्नसाठा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत. तर या कारवाईत 22 गुन्हे दाखल करत २० आरोपींनाही अटक करण्यात आल्याची माहिती आहे. यासोबतच 8,392 किलो मुदतबाह्य, खराब आणि नाकारलेला अन्नसाठा देखील या कारवाईत जप्त करण्यात आलाय.

Maharashtra FDA Actions News: राज्यातील सहा विभागांत धडक मोहीम

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या सहाही विभागांत ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नष्ट करायचे अन्न पुन्हा बाजारात आणून ग्राहकांच्या ताटापर्यंत धोका पोहोचवणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नवरात्रोत्सवानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई, खवा, खाद्यतेल, सुकामेवा व फराळाच्या पदार्थांची मागणी वाढणार असल्याने एफडीएतर्फे धडक मोहीम राबवण्यात येणार आहे.

Malashiras : माळशिरसमध्ये FDAची मोठी कारवाई; 1336 किलो भेसळयुक्त खवा जप्त करून नष्ट, 4.81 लाखांचा मुद्देमाल

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA), सोलापूर विभाग झोन-2 ने माळशिरस मध्ये मोठी कारवाई केली आहे. पुणे-पंढरपूर रोडवरून खवा वाहतूक करणाऱ्या वाहनावर छापा टाकून 1337 किलो खवा जप्त करण्यात आला आहे. तो नाशवंत असल्याने तपासणीनंतर लगेचच एका खड्ड्यात नष्ट करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार, MH 25 AJ 4023 क्रमांकाचे वाहन हे धाराशिव जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन वेगवेगळ्या उत्पादकांनी बनवलेला खवा घेऊन सातारा शहरातील घाऊक आणि किरकोळ विक्रेत्यांना विक्री व वितरणासाठी जात होते. उघड्यावर कोणतीही नियमाचे पालन न करता होत असलेल्या या खव्याची तपासणी केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

शांततापूर्ण आंदोलन नागरिकांचा घटनात्मक अधिकार, दाबण्याचा प्रयत्न केल्यास नेपाळ, श्रीलंका, बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण होईल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा

Read Entire Article