Maharashtra Investment : महाराष्ट्रात गुंतवणूक करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे यूकेमधील उद्योजकांना थेट आवाहन, सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या

2 weeks ago 5
ARTICLE AD

मुंबई : कौशल्य, भांडवल आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या ठोस गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट परिसंस्था कार्यरत आहे. सर्वच क्षेत्रातील उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी असलेल्या परिसंस्थेच्या (Investment Ecosystem) निर्मितीत महाराष्ट्र हा सर्वात आघाडीवर आहे, अशा स्पष्ट शब्दांत महाराष्ट्राचे महत्त्व अधोरेखित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युनायटेड किंगडममधील (UK) नामवंत संस्था आणि उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे खुले आवाहन केले आहे. मुंबई येथे ताज पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित 'महाराष्ट्र-यूके भागीदारी शुभारंभ' कार्यक्रमात ते बोलत होते.

गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ (Invest Maharashtra) या डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल. यूके मधील सचिव, महापौर व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हा दौरा केवळ औपचारिक भेट नसून दोन्ही देशांमधील महत्त्वाकांक्षेचे प्रत्यक्ष व्यवसाय आणि करारांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Invest Maharashtra Platform : विविध क्षेत्रांत सामंजस्य करार

या उच्चस्तरीय कार्यक्रमादरम्यान यूकेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या द्विपक्षीय चर्चांनंतर विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र आणि यूके दरम्यान औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, "मुंबई आंतरराष्ट्रीय वित्त, व्यापार आणि उद्योजकतेला जागतिक बाजारपेठांशी थेट जोडते, तर पुणे हे अभियांत्रिकी, वाहन उद्योग (Automobile) आणि आयटीचे (IT) प्रमुख केंद्र बनले आहे. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे (NEP) परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल', 'युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क' आणि 'युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डिन' यासारखी जागतिक दर्जाची विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. तसेच राज्यात उभारण्यात येणाऱ्या एज्युसिटी, मेडिसिटी आणि AI इनोव्हेशन सिटीमुळे जागतिक दर्जाचे संशोधन व प्रतिभा एकत्र येईल."

UK Delegation Statement : यूकेच्या राज्य सचिवांकडून कौतुक

युनायटेड किंगडमचे व्यवसाय, नवोन्मेष, विज्ञान आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक क्षमतेचे जोरदार कौतुक केले. ते म्हणाले की, "यूकेच्या ज्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश करू इच्छितात, त्यांच्यासाठी महाराष्ट्र हे सर्वात नैसर्गिक आणि योग्य ठिकाण आहे. या राज्याची निवड त्याच्या स्पष्ट आर्थिक ताकदीमुळे, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्वामुळे केली आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही युरोपमधील नॉर्वे (Norway) या देशापेक्षाही मोठी आहे. आम्ही येथे केवळ एका कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी आलेलो नाही, तर आम्हाला प्रत्यक्ष परिणाम आणि यश हवे आहे."

या ऐतिहासिक भागीदारीमुळे महाराष्ट्रातील स्थानिक उत्पादक, अन्नप्रक्रिया उद्योग (Food Processing), तंत्रज्ञान कंपन्या आणि लघुउद्योजकांना ब्रिटनमध्ये नव्या बाजारपेठा व ग्राहक मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

ही बातमी वाचा:

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगानुसार लेवल 10 च्या कर्मचाऱ्यांची लॉटरी, 10 वर्षांत मिळणार 34 लाख रुपये एक्स्ट्रा; पाहा कॅल्क्युलेशन

Read Entire Article