<p><strong>Maharashtra Live News Updates: </strong>नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती आणि नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तालुका स्तरावर बैठका घेण्यात आल्या जिल्हा परिषदे कडून जिल्ह्यात 50 हजारापेक्षा जास्त नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही यासाठी विस्तृत आराखडा हा तयार करण्यात आला आहे. शेकडो टँकरद्वारे तब्बल 700 ते 800 गाव आणि खेड्यांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा हा केला जाणार आहे. जलश्रोत आरक्षित करून त्यातून पाणीपुरवठा हा नागरिकांना केला जाईल मालेगाव, मनमाड, नांदगाव, पेठ सुरगाणा आणि इगतपुरी या भागातील गाव खेड्यांवर सर्वाधिक जास्त पाणीपुरवठा केला जाणार असून या जिल्ह्यात सर्वाधिक भीषण परिस्थिती आणि पाणीटंचाई निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने मांडला आहे.</p>