मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढल्यास चक्रीवादळात रूपांतर होण्याची (Maharashtra Rain Update) शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संभाव्य हवामान बदलामुळे २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातील काही भागांत पाऊस (Maharashtra Rain Update) पडण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पावसाच्या सरी कोसळू शकतात.(Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update : कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याची शक्यता

पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसांत या प्रणालीची तीव्रता वाढू शकते. हवामानातील या घडामोडींमुळे कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संभाव्य चक्रीवादळाचे नाव 'अर्णव' असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Rain Update : आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर परिणाम होण्याची शक्यता

हे संभाव्य चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे. उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा या भागांदरम्यान हवामान प्रणालीचा प्रभाव राहू शकतो. चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर मध्य प्रदेशच्या दिशेने सरकल्यास महाराष्ट्रातही पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Maharashtra Rain Update : विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता; शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

२७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी हंगामातील पेरण्यांसाठी काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. मात्र, प्रत्यक्ष पाऊस किती आणि कोणत्या भागांत पडेल, हे चक्रीवादळाची दिशा, त्याची तीव्रता आणि पुढील हवामान परिस्थितीवर अवलंबून असेल.

हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनी नमूद केलेल्या शक्यतेनुसार, संभाव्य चक्रीवादळाची वाटचाल आणि त्याचा महाराष्ट्रावरील परिणाम याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अधिकृत अंदाजांकडे लक्ष द्यावे.

तर खबरदारीचा उपाय म्हणून, भारतीय हवामान विभागानं मच्छिमारांना शुक्रवार संध्याकाळपासून पुढील बुधवारपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. हवामान विभागानं म्हटलं आहे की, "मच्छिमारांना 23 ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून 25 ऑक्टोबरपर्यंत बंगालच्या उपसागराच्या पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय भागात, तसंच 26 ते 28 ऑक्टोबर दरम्यान पश्चिम-मध्य आणि लगतच्या नैऋत्य भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे." दरम्यान, या अंदाजामुळं मत्स्यव्यवसाय विभाग आणि मासेमारी बंदरांच्या प्रशासनाला मच्छिमारांना सतर्क करण्याच्या आणि हवामान विभागाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या पुढील सागरी इशाऱ्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.