मुंबई : राज्यातील पावसाच्या चिंतेंने व्याकूळ झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे, ऑगस्ट महिन्यात पाऊस थांबल्यामुळे बळीराजाची चिंता वाढली होती. भारतीय हवामान विभागाने (Maharashtra Rain Update) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील 2 ते 3 दिवसांत विदर्भ आणि त्याला लागून असलेल्या भागात पावसाचा जोर वाढण्याची (Maharashtra Rain Update) शक्यता आहे. ओडिशाहून पश्चिमेकडे सरकणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्रादरम्यान तयार झालेल्या वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे 2 सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढेल. या हवामान बदलांमुळे 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update: पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता

तर पुढील दोन दिवस विदर्भात खासकरून पूर्व विदर्भातील जिल्ह्यात मध्यम पावसाची शक्यता असल्याचे अंदाज प्रादेशिक हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने व्यक्त केले आहे. हवामान विभागाने 2 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर या दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते दमदार पावसाची शक्यता (Maharashtra Rain Update) व्यक्त केली आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील गोंदिया,भंडारा,चंद्रपूर गडचिरोली व नागपूरच्या काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पूर्व विदर्भातील काही जिल्हात पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्याना 'यलो' अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, पूर्ण सप्टेंबर महिन्यात सामान्य पेक्षा कमी पावसाचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये निर्माण झालेली पावसाची मोठी तूट काही प्रमाणात भरून निघते का, याकडे आता लक्ष लागले आहे.(Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update: सप्टेंबर महिन्यात विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने जारी केलेल्या अंदाजानुसार, सप्टेंबर महिन्यात विदर्भातील बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. गोंदिया, भंडारा तसेच गडचिरोली आणि चंद्रपूरचा लगतचा काही भाग वगळता, उर्वरित विदर्भात सप्टेंबर महिन्यात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा प्रबळ अंदाज आहे, तर 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 7 ते 8 दिवसांच्या अंदाजाबाबत बोलताना हवामान तज्ज्ञांनी सांगितले की, गंगीय पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशाच्या लगतच्या भागात एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Well-Marked Low-Pressure Area) निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. याच्या प्रभावामुळे 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नागपूरच्या काही भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पुढील 3 दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.(Maharashtra Rain Update)

Maharashtra Rain Update: पावसाची तूट भरून निघणार का?

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रवीण कुमार, यांनी माहिती देताना सांगितलं की, 1 जून ते 31 ऑगस्ट या काळात संपूर्ण विदर्भात एकूण 22% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 30 ते 40% पर्यंत आहे. सप्टेंबर महिन्यात अपेक्षित असलेल्या पावसामुळे ही तूट भरून निघण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कारण, हवामान विभागाच्या एकंदरीत अंदाजानुसार संपूर्ण सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.