Maharashtra School मुंबई : राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये आता माता -पालक शैक्षणिक मेळाव्याचे आयोजन (Educational Gathering for Parents) करण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्त यांनी या संदर्भ एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अशैक्षणिक कामांचे अधिक शिक्षकांना ओझे असल्याने पालक मेळाव्याच्या आयोजनावर शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. एसआयआर, जनगणना त्यासोबतच इतर उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे अध्यापनाला वेळ कमी मिळत असल्याने पालक मेळावा आयोजित केल्याने अधिक अडचण निर्माण होत असल्याची शिक्षक संघटनांची तक्रार होती. परिणामी आता नवीन शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीलाच महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांमध्ये 'माता-पालक शैक्षणिक मेळावा' हा उपक्रम एका व्यापक सामाजिक चळवळीच्या रूपात आयोजित करण्यात येत आहे. (Educational Gathering for Parents)

Maharashtra School : प्रत्येक शैक्षणिक वर्षात चार वेळा मेळाव्याचे आयोजन, शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचा सूर

दरम्यान, प्रत्येक शैक्षणिक वर्षात चार वेळा मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. यात जुलै, ऑक्टोबर, जानेवारी व एप्रिल महिन्यात पहिल्या शनिवारी याचे आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आहे. सदर विशेष मेळाव्याचे आयोजन राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या (शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित) सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये प्रत्यक्ष शाळास्तरावर केले जाईल. तर याची जबाबदारी मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती (SMC) यांच्यावर हा मेळावा आयोजित करण्याची प्राथमिक जबाबदारी असेल. मात्र, अशैक्षणिक कामांचे अधिक शिक्षकांना ओझे असल्याने पालक मेळाव्याच्या आयोजनावर शिक्षक संघटनांची नाराजी व्यक्त केली आहे.

Educational Gathering for Parents: माता-पालकांशी थेट संवाद

दरम्यान, हा मेळावा शाळांमधील नेहमीची साधी किंवा औपचारिक मासिक सभा म्हणून न ठेवता, माता-पालकांशी थेट संवाद साधण्याचा आणि त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती निर्माण करण्यासाठी एक प्रभावी प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात येणार आहे. यात मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, नवीन अभ्यासक्रम व त्यानुसार पाठ्यपुस्तके, विद्यार्थी लाभाच्या विविध योजना, व्यावसायिक शिक्षक, PAT उपस्थिती भत्ता आणि डिजिटल शिक्षण माहिती मातांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे.

माता पालक शैक्षणिक मेळाव्याचे मुख्य उद्देश काय?

1. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा आणि पालक यांच्यात सुसंवाद व समन्वय असणे (सूचना, तक्रारी व अपेक्षा यावर मुक्त चर्चा, APAAR ID, UDISE + व इतर शैक्षणिक नोंदी, आवश्यक कागदपत्रे व माहिती अद्ययावत ठेवणे. शाळेची ओळख व उद्दिष्टे, शाळेची कार्यपद्धती, ध्येय व मूल्ये)

2. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालकांना देणे, (मूल्यमापन पद्धती व परीक्षा वेळापत्रक. वाचन संस्कृती व घरातील अभ्यास, घरी अभ्यासासाठी योग्य वातावरण, वाचनाची सवय विकसित करण्यासाठी उपाय)

3. विद्यार्थ्यांची उपस्थिती, उपस्थितीचे महत्व, विद्यार्थ्यांचे वर्तन व अध्ययनातील अडचणी यांवर चर्चा करणे. गळती व गैरहजेरी रोखणे

4. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सहभाग वाढविणे, (आरोग्य व पोषण, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, स्वच्छता, पौष्टिक आहार व सुरक्षितता, बालसुरक्षा व बालहक्क, बाल संरक्षण.)

5. शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती पालकांपर्यंत पोहोचविणे. (विविध योजना, वार्षिक नियोजन, शाळेतील महत्त्वाचे कार्यक्रम, स्नेहसंमेलन, सहल, स्पर्धा व उपक्रमांची माहिती प्राथमिक, माध्यमिक असे शाळांचे प्रकार लक्षात घेता विषयांत आवश्यकतेनुसार बदल करावा इत्यादी)

6. माता-पालकांनी शैक्षणिक कामकाज, शैक्षणिक उपक्रम यामध्ये सहभागी होणे.

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai Bank Election: भाजपच्या दरेकर-प्रसाद लाडांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची एन्ट्री, मुंबै बँकेच्या निवडणुकीत पॅनल उतरवणार, सहकार क्षेत्रात फडणवीस-शिंदे सामना रंगणार?