Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?

4 days ago 3
ARTICLE AD

Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live Updates: विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीची 5 मतदारसंघात आज मतमोजणी (Maharashtra Vidhan Parishad Result 2026) होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. नागपूर, अमरावती,मराठवाडा आणि पुणे या मतदारसंघात निवडणूक होती. 23 ऑक्टोबरला झालेल्या मतदानात 182 उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झालंय. अनेक ठिकाणी बंडखोरांनी आणि अपक्षांनी मोठं आव्हान उभं केलंय. (graduate teachers constituency result)

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणीला सकाळी 8:00 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या मतदारसंघांमधील लढतींमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक ठिकाणी मित्रपक्षांमधील मैत्रीपूर्ण लढती, बंडखोरी आणि अपक्षांच्या आव्हानामुळे राजकीय समीकरणे अत्यंत गुंतागुंतीची झाली असून मतमोजणीच्या निकालांचा सस्पेन्स आता शिगेला पोहोचला आहे.

विक्रमी मतदान अन् मतमोजणीची ठिकाणे

शुक्रवारी (23 ऑक्टोबर) पार पडलेल्या मतदानात विविध मतदारसंघांमध्ये मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. प्रशासनाने मतमोजणीची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे:

नागपूर पदवीधर: 64.76% मतदान (38 उमेदवार)
मतमोजणी: मानकापूर क्रीडा संकुल, नागपूर.

अमरावती शिक्षक: विक्रमी 91.08% मतदान (सुमारे 33 हजार मतदार)
मतमोजणी: लोकशाही भवन, अमरावती.

पुणे पदवीधर व शिक्षक: पदवीधर 62.78%, तर शिक्षक 85.87% मतदान (2020 च्या तुलनेत वाढ)
मतमोजणी: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर: 58.67% मतदान
मतमोजणी: एमआयडीसी, चिकलठाणा.

Read Entire Article