Maharashtra Voter List SIR : मोठी बातमी! SIR यादीतून राज्यातील दोन कोटी मतदारांना वगळलं, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?

1 month ago 10
ARTICLE AD

Maharashtra Voter List News : राज्यातील मतदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘विशेष सखोल पुनरीक्षण 2026’ (Special Intensive Revision SIR) अंतर्गत राज्याची नवी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, या यादीतून राज्यातील तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त मतदारांची नावे वगळण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सखोल पुनरीक्षणाची ही प्रक्रिया राबवण्यापूर्वी राज्यात एकूण 9,78,54,049 नोंदणीकृत मतदार होते. परंतु, नव्याने प्रसिद्ध झालेल्या मसुद्यात 7,71,65,562 (78.86%) मतदारांचाच समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच गणना प्रपत्र न मिळाल्यामुळे, गैरहजर असणे, स्थलांतर, मृत्यू किंवा दुबार नोंदणीमुळे तब्बल 2,06,88,487 (21.14%) मतदारांची नावे सध्याच्या यादीत समाविष्ट झालेली नाहीत.

Maharashtra SIR Draft Data : प्रारुप मतदार यादीतील आकडेवारी

या नव्या प्रारुप यादीत पुरुष मतदारांची संख्या 3,95,89,905 इतकी आहे, तर महिला मतदारांची संख्या 3,75,72,570 एवढी नोंदवण्यात आली आहे. याशिवाय 3,087 तृतीयपंथी मतदारांचा यादीत समावेश आहे. तुमचे नाव मतदार यादीत सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे आता प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

SIR Voters List : यादीतील नाव कसं तपासणार?

मतदारांनी त्यांचे नाव निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यात आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर भेट द्यावी. CEO Maharashtra या लिंकवर जाऊन  प्रारुप मतदार यादी 2026 यावर आपले नाव तपासावे.

Voter List Revision Schedule : दावे आणि हरकतींचे वेळापत्रक

वगळण्यात आलेल्या किंवा नवीन नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि दावे व हरकती नोंदवण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. यानंतर सर्व अर्जांची छाननी करून 4 नोव्हेंबर 2026 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे नवमतदारही यासाठी पात्र ठरणार आहेत.

Polling Station Rationlisation : मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण

या पुनरीक्षण प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि सुसूत्रीकरणही करण्यात आले आहे. आधी राज्यात 1,00,253 केंद्रे होती, त्यातील 431 केंद्रे कमी करून व 394 नवीन केंद्रे जोडून आता एकूण 1,00,216 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

Maharashtra Election Update : 1,403 केंद्रांचे स्थळ बदलले

मतदारांच्या सोयीसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने 1,403 मतदान केंद्रांचे स्थळ बदलण्यात आले असून, त्यांना तात्पुरत्या रचनेवरून पक्क्या आणि सुरक्षित इमारतींमध्ये हलवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपले नाव आणि मतदान केंद्र तात्काळ तपासून घेणे गरजेचे आहे.

मतदारयादीत तुमचं नाव आहे की नाही, या लिंकवर क्लिक करा

Read Entire Article