Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यात एकीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा कायम असताना दुसरीकडे पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने आज (18 ऑक्टोबर) रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी (Rain In Maharashtra) केला आहे. कोकण किनारपट्टीवर पुढील 5 दिवसांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 18, 19 आणि 20 ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Updates)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांसह पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर येथे वादळी वाऱ्यांसह पाऊस (Rain Marathi News) पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुणे, सातारा, रायगड, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित भागांतील नागरिकांनी हवामानाच्या बदलांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात येत आहे. पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता- (Rain Marathi News)

नैऋत्य मान्सून महाराष्ट्राच्या (Maharashtra Rain) उर्वरित सर्व भागांतून तसेच गोवा, कर्नाटक, तेलंगणा व ओडिशाच्या काही भागांतून आणि झारखंड व छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून मागे फिरला आहे. याबाबत हवामान विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. मात्र हवामान विभागाने (IMD) दिलेल्या नवीन अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत उत्तर, पूर्व आणि दक्षिण भारतातील काही भागांत हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारत आणि डोंगराळ प्रदेशातील अनेक भागांत विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Maharashtra Weather Updates)

देशातील 16 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा- (Rain Updates)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये व प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?