Eknath Shinde Infrastructure : राज्यात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. मुंबईतही काँक्रिटच्या रस्त्यांचे जाळे विणले जात असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एका तासात कसे पोहोचता येईल याचं नियोजन आम्ही करत आहोत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. एकनाथ शिंदे एबीपी माझाच्या 'माझा इन्फ्रा व्हिजन' या कार्यक्रमात बोलत होते.

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाला वेग देणारा गेमचेंजर प्रकल्प ठरला आहे. 701 किमी लांबीच्या या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण करताना शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या प्रक्रियेबाबत एकनाथ शिंदे यांनी मोठी माहिती दिली. समृद्धीसाठी जमीन हस्तांतरित झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

समृद्धी महामार्गासह महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांवर बोलताना शिंदे यांनी या प्रकल्पाला सुरुवातीला विरोध आणि अनेक आव्हानांचा सामना करावा लागल्याचं सांगितलं. मात्र लोकांचा विश्वास संपादन करून प्रकल्प पूर्ण करण्यात आला. आता समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मल्टीनॅशनल कंपन्या येत असून त्यामुळे रोजगार, उद्योग आणि विकासाला चालना मिळत असल्याचा दावा त्यांनी केला.