Manoj Jarange Audio Clip Marathi News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख आहे. तसेच भाजपकडून षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला आहे. मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

मनोज जरांगेंनी भर पत्रकार परिषदेत ऐकवलेली ऑडिओ क्लिपमध्ये तीन ते चार व्यक्तींचे आवाज ऐकू येत आहेत. त्यामुळे या ऑडिओ क्लिपमधील आवाज नेमके कुणाचे आहेत?, याबाबत चर्चा रंगली आहे. याचदरम्यान, मनोज जरांगेंनी सादर केलेली ऑडिओ क्लिप खरी असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. ऑडिओ क्लिप कुणी व्हायरल केली?, ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी केली आहे. ऑडिओ क्लिपची चौकशी करा, यामधील आवाजाची चौकशी करा...यानंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असंही उदय सामंत म्हणाले.

मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये काय? (Manoj Jarange vs Eknath Shinde)

जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये पहुँच चुके है...

श्रीकांत शिंदे के पाससे पहुँच चुके है...

जरांगे पाटील विधानसभा चुनाव मे हमारे फायदे का रहेगा या...नहीं रहेगा..इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है..

आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही...

मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर नेमका आरोप काय? (Manoj Jarange On Eknath Shinde)

एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत..जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मी जर उद्या सकाळी बोललो ना मराठ्यांनी 100 रुपये टाका. तर उद्या माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील. लहान विषय नाही शिंदेसाहेब...तुमचा माझा सामना 3 महिन्यानंतर होईल, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. मात्र एकनाथ शिंदेंनी सगळे आरोप फेटाळले. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावं, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल, असे म्हणत जरांगे पाटलांच्या आरोपवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना 500 कोटी पोहोचले? वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल, VIDEO:

संबंधित बातमी:

Manoj Jarange : काल 500 कोटींचा आरोप, आज ऑडिओ क्लिप ऐकवली; मनोज जरांगे म्हणाले, आता ही लोक कोण? फडणवीस-शिंदेंनी शोधावं!