Manoj Jarange Mumbai Agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलना संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या मुंबईतील 19 सप्टेंबर रोजीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यासाठी 19 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार होते. त्या संदर्भात हमीपत्र देखील मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान पोलिसांना दिलं होत. मात्र पोलिसांनी आझाद मैदान पोलिसानी गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली आहे. मागच्या आंदोलनाचा दाखला देत आझाद मैदानात आंदोलन करताना नियम व अटींचा भंग केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

Manoj Jarange Mumbai Agitation: गेल्यावर्षीच्या अटी शर्तींचा भंग केल्याचा दाखला देत परवानगी नाकारली

मनोज जरांगे पाटील यांनी जरी मुंबई पोलिस आयुक्त यांना पत्र लिहून परवानगी मागितली असली तरी जरांगे पाटील यांनाही मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळण्याची शक्यता कमीच होती. तसेच जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस बजावून मुंबईत न येण्याबाबत कळवले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जरांगे पाटील यांनी मागील आंदोलनावेळी मराठा आंदोलकांकडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्यात आले होते. मुंबईतील सीएसएमटी स्थानकाबाहेर रस्तारोको करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला होता. तसेच आंदोलनादरम्यान अनेक नियमांचे उल्लघंन केले होते. दरम्यान, मुंबई येऊ घातलेला गणेशोत्सव लक्षात घेता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो, तसेच या दरम्यान मराठा आंदोलन झाल्यास त्याचा भार हा पोलिस यंत्रणेवरही येऊ शकतो. त्यामुळे मुंबई पोलिसांकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याचे बोललं जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या