Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला 'या' कारणामुळे परवानगी नाकारली

1 month ago 3
ARTICLE AD

Manoj Jarange Mumbai Maratha Morcha: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईत आंदोलन करण्याच्या मनसुब्यांना मुंबई पोलिसांनी मोठा झटका दिला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) उपोषण करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आपण सर्व अटी-शर्तींचे पालन करु, असेही त्यांनी सांगितले होते. तसे हमीपत्रही मनोज जरांगे यांनी पोलिसांना दिले होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी 19 सप्टेंबरच्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.  दक्षिण मुंबईतील (South Mumbai) सामान्य व्यवहार जसे शाळा, रुग्णालय, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आरोग्य बाधित होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होणार असल्याने आझाद मैदान येथे आमरण उपोषण व आंदोलन करण्यास मागितलेली परवानगी नाकारत असल्याचे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी पत्रात म्हटले आहे. आता पोलिसांकडून मनोज जरांगे यांना नोटीस पाठवून आंदोलन न करण्याबाबत बजावण्यात येईल.

गेल्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलं होते, मुंबईची परिस्थिती काय झाली होती, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता, याचा पोलिसांकडून दाखला देण्यात आला आहे. त्यावेळी सीएसएमटी परिसर असेल किंवा महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. मोठ्याप्रमाणात मराठा आंदोलक रस्त्यावर उतरले होते. परिणामी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्यावेळी मुंबई पोलिसांनी अटी शर्तींसह परवानगी दिली होती. आझाद मैदानात 5000 बांधव जमतील, अशी अट होती. मात्र, त्यापेक्षा अधिक लोक जमले होते. हाच दाखला देऊन मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंच्या या आंदोलनाला परवानगी नाकारल्याचे समजते.

तसेच मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश उत्सवादरम्यान भाविकांची होणाऱ्या अलोट गर्दीमुळे मुंबई हि कायम राष्ट्रविघातक शक्तीच्या निशाण्यावर राहिलेली आहे. त्यादृष्टीने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. सदरील आंदोलन दरम्यान होणाऱ्या अलोट गर्दीमुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनामध्ये बाधा निर्माण होणार असल्याचेही पोलिसांच्या पत्रात म्हटले आहे.

आणखी वाचा

Manoj Jarange Patil Maratha Morcha Mumbai: शिंदे-फडणवीसांचा कट शिजलाय, मराठा मोर्चात मला गोळ्या घालायचा डाव; मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक आरोप

Read Entire Article