Manoj Jarange Patil : अंतरवली सराटीत आजपासून अमरण उपोषण सुरू (Manoj Jarange Patil Andolan) केलंय. 58 लाख नोंदीचे तत्काळ कुणबी प्रमाणपत्र सरकारनं द्यावं. आता मला वेळ देता येणार नाही. स्वार्थाने दुनिया भरली आहे. पण मी गेल्या तीन वर्षांपासून समाजासाठी प्रामाणिकपणे लढतो आहे. सरकारने महाराष्ट्रातील आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घ्यावे. बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि मदत द्यावी. मराठ्यांच्या लेकरांनी आता वाट बघायची नाही. तातडीने अंतरवलीमध्ये वेळ मिळेल तसं येऊन वेळ द्यायचा आहे. हा शेवटचा लढा आहे. आपण विजयाच्या उंबरठयावर असल्याचे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला (Maratha Reservation) आवाहन केलं आहे.

पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) , एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अजितदादांच्या (Ajit Pawar) नावाचा उल्लेख केला. त्यानंतर जरांगे पाटील यांनी स्पष्टीकरण देत 'अजितदादा आपल्यातून गेल्या सारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडांत अजित दादांचे नाव आले, असे म्हणत स्पष्टीकरण दिलंय.

Manoj Jarange Patil on Ajit Pawar 'अजित दादा गेल्या सारखे वाटतच नाहीत'

'सरकारशी आज गोडीने बोलतोय. उद्या बिघडू शकतो. सरकारने सर्व तोडगे वेळेत काढा. एकनाथ शिंदे साहेब समजून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस साहेब समजून घ्या साहेब बोलतोय. अजितदादा तुम्ही देखील समजून घ्या' असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. मात्र ही बाब पुढे लक्षात येताच जरांगे पाटील यांनी अनावधानाने अजित दादांचा उल्लेख केल्याचे म्हटलं. 'अजित दादा गेल्या सारखे वाटतच नाहीत, त्यामुळे तोंडांत अजित दादांचे नाव आल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : मला उद्यापासून बोलता येणार नाहीये. आता हा अखेरचा लढा

आपण आज घराबाहेर पडलो नाही तर आपण कायम गरीब राहणार आहोत. आपल्या लढ्यामुळे पुढच्या पिढ्याचं कल्याण होणार आहे. मला उद्यापासून बोलता येणार नाहीये. त्यामुळे आज मी समजापुढे माझं म्हणणं मांडतोय, असेही जरांगे पाटील म्हणालेत. आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत, आता माघार नाही. गेल्या तीन वर्षांपासून आपण लढतोय, आता हा अखेरचा लढा आहे. गाफील न राहता, घरात बसून न राहता आता मुंबई असो किंवा अंतरवली सराटी आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे. असेही आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे. अण्णासाहेब महामंडळातून व्याज परतावे द्या. सर्वच एकदाच द्या. असेही ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बिगरमराठा, जातीय आकसापोटी मनोज जरांगेंचं आंदोलन; गुणरत्न सदावर्तेंचा आरोप