Manoj Jarange Patil Mumbai Maratha agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटीतून मुंबईतील मराठा आंदोलनाची घोषणा केली. गणपती बसवायचा आणि निघायचं 15 सप्टेंबरला. अंतरवालीवरुन सकाळी 11 वाजता मुंबईच्या दिशेने मराठ्यांचा महासागर निघेल. आजपासून तयारीला लागा. 15 सप्टेंबरचा मुक्काम पाटोदा, 16 सप्टेंबरचा मुक्काम श्रीगोंदा, अहिल्यानगर... 17 सप्टेंबर हडपसर, पुणे जिल्हा... 18 सप्टेंबर खोपोली, 19 सप्टेंबर सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरु करायचे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. मनोज जरांगे पाटील यांचा मराठा मोर्चा 20 सप्टेंबरला म्हणजे गणेश विसर्जनापूर्वी मुंबईत येऊन धडकणार आहे. त्यामुळे आता राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा, ही सगळी परिस्थिती कशी हाताळणार, हे पाहावे लागेल.

अंतरवाली सराटीतून ठिकठिकाणी मुक्काम करत मनोज जरांगे यांचा मराठा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. प्रत्येक मुक्कामापूर्वी आपण दररोज 100 किलोमीटर अंतर पार करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता मराठा मोर्चा सप्टेंबर महिन्यात निघाल्यास गणेश विसर्जनापूर्वी मुंबईत पोहोचणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं झाल्यास मुंबई पोलीस परिस्थिती कशाप्रकारे हाताळणार, हे बघावे लागेल.

मुंबईतून आरक्षण घेऊन येईपर्यंत शांततेतच आंदोलन करायचे. दगडफेक कोणी करायची नाही, कोणी जाळपोळ करायची आहे. वाहनं शांत चालवायची आहे. या आचारसंहितेचे पालन सगळ्यांनी करायचे, अशी सूचना मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना केली. मुंबईत गेलेल्या सर्वांनी शांतता हा मार्ग स्वीकारायचा. आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे आणि आमचा हक्क मिळवायचा आहे, असे जरांगे यांनी म्हटले.

Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे

Maratha Morcha Route:मनोज जरांगे कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचणार?

अंतरवाली सराटीतून निघणार

15 सप्टेंबर- पहिला मुक्काम - पाटोदा, बीड

16 सप्टेंबर- दुसरा मुक्काम - श्रीगोंदा, अहिल्यानगर

17 सप्टेंबर- तिसरा मुक्काम - हडपसर, पुणे

18 सप्टेंबर- चौथा मुक्काम - खोपोली, रायगड

19 सप्टेंबर- आझाद मैदान, मुंबई उपोषण सुरु

Maratha Reservation: श्रीमंत मराठ्यांनी मुंबईला जायला गाड्या द्याव्यात: मनोज जरांगे

आपल्याला कोणी खुन्नस दिली म्हणून कोणी मोठा होत नाही. आपण त्याला खुन्नस दिली पाहिजे असे नाही. समाज हा सगळ्यांचा बाप असतो. जो रुट असेल तो असेल. कुठूनही गेलं तरी जायचंचं मुंबईला, भावना समजून घ्या. जाताना थोडी वाट वाकडी करा, फक्त 100 ते 150 किलोमीटर जास्त पडेल फक्त. आपल्या मुंबईला जाऊन जिंकून यायचं आहे. आपल्याला मुक्काम करत जावं लागतं. आपला पहिला मुक्काम बीड जिल्ह्यात असेल. दुसरा मुक्काम श्रीगोंद्यात करावा लागेल. तिसरा मुक्का पुण्यातील हडपसर येथे करु. चौथा मुक्काम खोपोलीत असेल, कदाचित त्यानंतर कोपरखैरणेत मुक्काम करु आणि पाचवा मुक्काम मुंबईच्या आझाद मैदानात असेल, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आम्ही ज्या जिल्ह्यातून जाऊ त्या जिल्ह्यातील लोकांनी रस्त्यावर येऊन आम्हाला आशीर्वाद देऊन घरी जावे. जे लोक मुंबईला येणार नाही, त्यांनी आशीर्वाद द्यायला यावे. नोकरदार, व्यावसायिक, राजकारणी, गरीब शेतकरी यांना मुंबईला यायला जमणार नाही. मी तारीख सांगेन त्या तारखेला रस्त्यावर यावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

आम्ही तुमच्या लेकरांसाठी भांडतो. ज्यांच्याकडे फोर व्हीलर गाड्या आहेत. त्यांनी आम्हाला मुंबईपर्यंत सोडायला गाड्या घेऊन या. आम्हाला मुंबईच्या वेशीपर्यंत सोडून परत या. तुमची ड्युटी तुम्ही करा, आम्हाला फक्त मुंबईच्या वेशीपर्यंत सोडा, तिथून तुमच्या गाड्या परत घेऊन जा. आम्ही तिथून पुढे आझाद मैदानात जाऊ. तुमची गाडी घरी उभी राहील, ती फक्त मुंबईतपर्यंत पाठवा चार दिवस डिझेल भरुन. तुमचं फक्त डिझेल जाईल, पण त्यामुळे मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं सोनं होईल, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

आणखी वाचा

Manoj Jarange: पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना सांगतो, अंतरवालीपासून मुंबईपर्यंत कुठेही अडवायचं नाही,जिथं अडवाल तथं...: मनोज जरांगे