Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis and Eknath Shinde: मुंबईतील मराठा आंदोलनाचे रणशिंग फुंकणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी अंतरवाली सराटीतून बोलताना एक खळबळजनक दावा केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांचा माझ्याविरोधात कट शिजला आहे. मोर्चात त्यांचीच लोक घालून गोंधळ करुन त्यांना मला मारायचे आहे. भाजपचे आणि शिंदे यांचे मराठा आमदार हे मोर्चाला जाऊ नका म्हणून फोन लावत आहेत. मोर्चात गोळ्या घालायचा डाव आहे. मराठ्यांना न मारता फक्त मला शूट करणार आहेत. पण मी शरण येणार नाही, असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी म्हटले. मराठ्यांनो तुम्ही मला साथ द्यायची नसेल तर नका देऊ. तुम्हाला भीती असेल तर घरात बसा. आता फक्त मुंबईला जाताना या आणि त्यानंतर माझ्या अंत्ययात्रेला या, असे भावनिक आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले. (Maharashtra Politics news)

आपण 19 सप्टेंबरला मुंबईत पोहोचणार आहोत. सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर मी उपोषणाला बसणार आहे. आपल्या गरीबाच्या बाजूने न्यायदेवता आणि न्यायाधीश आहेत. आपण मुंबईला जाणार, आपण कायद्याला मानतो. त्यामुळे आझाद मैदानावरील उपोषणाच्या परवानगीसाठी आपण अर्ज केला आहे. परवानगी द्यायची की नाही हे देवेंद्र फडणीस साहेबांनी ठरवावे. मुंबईच्या बांधवांनी अर्ज दिला आहे, मी मुंबईला जाणारच. माझी काय चूक, मी कायद्याचे उल्लंघन करत आहे का? तुम्ही अटीशर्ती घालायच्या असतील तर घाला. चंद्रशेखर बावनकुळे हे बाईच्या आडून वार करतात. नागाच्या शेपटावर पाय दिल्यावर आम्हाला दाखवावे लागेल. दुसऱ्या राज्यापर्यंत आमचे हात आहेत, आमचे पण केंद्रात मंत्री आहेत. इथले चार दोन मंत्री आम्ही अडचणीत आणणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून वाशीमधून GR घेऊन आलो होतो. तेव्हा शिंदे साहेबांचा सन्मान केला तेव्हा मराठे गोड लागत होते. समजा माझं आणि फडणवीस याचं चांगले झाले तर तुमचे काय होईल, असा सवाल जरांगे यांनी एकनाथ शिंदेंना विचारला. फडणवीस यांनी सर्व मागण्या मान्य करुन बाजी मारली तर मग मराठ्यांचं आणि फडणवीस यांचं चांगलं होईल, मग बाकीच्यांचं काय होणार? आणखीनही सांगतो चौकशा लावून मी शरण येणार नाही. मरण पत्कारेन, पण तुम्हाला शरण येणार नाही. मुंबईत स्टेजवर रक्त सांडेन, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.

आणखी वाचा

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगे पाटलांनी मुंबई पोलिसांना धाडलं पत्र, 19 सप्टेंबरला आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी मागितली, पोलिसांचं वेट अँड वॉच धोरण