Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मनोज जरांगेंचा मुंबई पोलिसांना पुन्हा अर्ज; आता 50 लोकांना आंदोलन करण्याची मागितली परवानगी, आज दुपारपर्यंत परवानगी दिली नाही तर....

1 month ago 7
ARTICLE AD

मुंबई : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) उपोषणाचा आजचा 18 वा दिवस आहे. मनोज जरांगे आज (15 सप्टेंबर) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या काही मोजक्या समर्थकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना (Manoj Jarange Patil Mumbai Morcha) होणार आहेत. मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली असून रविवारी परवानागी नाकारण्यात आल्यानंतर मनोज जरांगेंच्यावतीनं तिसऱ्यांदा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मनोज जरांगे यांनी मुंबई पोलिसांकडे पुन्हा अर्ज केला आहे. 50 लोकांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मनोज जरांगेंच्या अर्जात केली आहे. आम्ही सगळ्या नियम आणि अटी पाळू, 18 तारखेला दिलेल्या वेळेत आम्ही आंदोलन करू, असंही नव्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. जर आज दुपार पर्यंत परवानगी दिली नाही तर मनोज जरांगे दुपारी कोर्टात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर आज केलेल्या या अर्जावरती पोलिस जरांगेंना आंदोलनाला परवानगी देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.(Manoj Jarange Patil Mumbai Morcha)

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: आझाद मैदानावर परवानगी मिळाली नाही तर ते उच्च न्यायालयात दाद मागणार

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदा परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे नेमके काय करणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली असली तरी आपण एकट्याने उपोषणाला जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. आपल्यासोबत इतर कुणीही मुंबईला जाणार नसून एकट्याने उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई पोलिसांनी दुसऱ्यांदाही कायदेशीर आणि सुरक्षेची कारणे देत उपोषण नाकारल्यामुळे जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम राहून आझाद मैदानावर परवानगी मिळाली नाही तर ते उच्च न्यायालयात (High Court) दाद मागणार आहेत. तर आज केलेल्या नव्या अर्जामध्ये त्यांनी 50 जणांना आंदोलन करण्याची परवानगी द्यावी अशी

Manoj Jarange Patil Mumbai Morcha: मुंबई पोलिसांनी आंदोलनाला परवानगी का नाकारली?

गेल्या वर्षीचा अनुभव : गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे 5,000 वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते.

गणेशोत्सवाचा काळ : 14 सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते.

आझाद मैदानावरील जागेची मर्यादा : आझाद मैदानातील 7,000 चौरस मीटर जागेत नियम 2025 नुसार कमाल 5,000 आंदोलकच समावू शकतात. मात्र जरांगेंनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे.

वाहतूक आणि रुग्ण सेवा : लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये (जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल), न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Entire Article