Manoj Jarange Patil Health News जालना : मराठा आरक्षणासाठी तब्बल 11व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे. अंतरवली सराटीत (Antarwali Sarati) जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असी भूमिका त्यांनी घेतली असून आमरण उपोषणाचा आजचा (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. असे असताना डॉक्टारांनी आज मनोज जरांगे यांची तपासणी केली असता त्यांचे शुगर वाढल्याचे आढळून आलंय. दरम्यान या वाढलेल्या ब्लड शुगर पातळीसंदर्भात मनोज जरांगे यांनी प्रश्न उपस्थित करत संशय व्यक्त केला होता. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर डॉक्टरांच्या पथकाने स्पष्टीकरण दिलं आहे. (Manoj Jarange Patil Health Update)

Manoj Jarange Patil Health News : डॉक्टरांकडून जरांगेंच्या शंकेचे निरसन; ‘ही नॉर्मल गोष्ट’ असल्याचे केले स्पष्ट...

मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. मात्र, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशीही ब्लड शुगर लेवल कमी होण्याऐवजी वाढत असल्याने मनोज जरांगे यांनी संशय व्यक्त केला होता. हे सरकारचे षडयंत्र तर नाही ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, जरांगे यांच्या या शंकेवर डॉक्टरांच्या पथकाने प्रतिक्रिया देत, ब्लड शुगर लेवलमध्ये झालेली वाढ ही नॉर्मल गोष्ट असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच, याबाबत मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करून त्यांचं समाधान केल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांनी ब्लड शुगर लेवल वाढत असल्याबाबत व्यक्त केलेल्या शंकेचे डॉक्टरांच्या पथकाकडून निरसन करण्यात आलं असल्याची माहिती मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करणारे डॉ. अमोल खवले यांनी दिली.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या मागण्या कोणत्या?

- निवृत्त न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे सर्वांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात यावे.

- हैदराबाद गॅझेटिअरचा केवळ जीआर काढण्यात आला आहे, परंतु त्यातील संख्येनुसार मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आलेली नाहीत. नोंदींनुसार मराठवाड्यातील संपूर्ण मराठा समाजाला तात्काळ कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत आणि त्याची व्हॅलिडिटी कशी देणार, हे स्पष्ट करावे.

- सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान आणि औंध-पुणे-बॉम्बे गव्हर्नमेंट गॅझेटिअरचा तातडीने जीआर काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी.

- मराठा समाजासाठी मराठा आणि कुणबी असे स्वतंत्र मंत्रालय तत्काळ स्थापन करण्यात यावे.

- अंतरवाली सराटीतील गुन्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.

- ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत, त्यांना प्रमाणपत्रे द्यावीत. तसेच ज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत, त्यांना लगेचच हॅलिडिटी प्रमाणपत्र द्यावे.

- सारथी संस्थेच्या सर्व प्रलंबित योजना सुरू कराव्यात, डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्तीचा निधी तातडीने वितरीत करावा आणि वसतिगृहांच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

- मराठा समाजाला ओबीसींच्या सर्व सोयी-सुविधा आणि सवलती देण्याबाबत काढलेल्या जीआरची प्रभावी अंमलबजावणी करावी.

- शिंदे समितीला कुणबी नोंदी शोधण्यासाठी आजपासूनच पुन्हा जुने रेकॉर्ड तपासण्याचे निर्देश द्यावेत.

- EWS, SEBC आणि ESBC प्रवर्गातून निवड झालेल्या मराठा तरुणांना आजच्या आज नियुक्ती पत्रे देण्यात यावीत.

- अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ज्या मराठा तरुणांनी वाहने घेतली आहेत, त्यांचा प्रलंबित असलेला संपूर्ण व्याज परतावा सरकारने जमा करावा.

- सगे-सोयरे बाबतच्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.

- मराठा आरक्षणाच्या लढ्यात बलिदान दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय नोकरी आणि आर्थिक मदत देण्यात यावी.

- राज्यामधील जात पडताळणी समिती बरखास्त करा.

इतर महत्वाच्या बातम्या

जरांगे पाटलांना भेटणार, 24 तासात योग्य निर्णय घेणार, सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसोबत, उदय सामंताचं मोठं वक्तव्य