Manoj Jarange: मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; आता ऑडिओ क्लिप आली समोर, नेमकं काय म्हटलंय?, VIDEO

1 week ago 3
ARTICLE AD

Manoj Jarange: काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं कौतुक करणारे मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) आता एकनाथ शिंदेंवर कोट्यवधींचे बॉम्ब टाकत आहेत. दोघांमधली शाब्दिक कुरबुर आता गंभीर वळणावर पोहोचली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या माध्यमातून एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंना 500 कोटी दिले, अशी भाजपमध्ये कुजबूज सुरु आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला. यानंतर स्वत: एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंकडे या आरोपवर पुरावे मागितले. आपण कुणाला 500 कोटी दिलेही नाही आणि घेतलेही नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंचे आरोप खोडून काढले. याचदरम्यान, आता मनोज जरांगे दावा करत असलेली ऑडिओ क्लिप माझाच्या हाती लागली आहे. मात्र एबीपी माझा या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

मनोज जरांगे दावा करत असलेली ऑडिओ क्लिप विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपच्या कॉन्फरन्स मीटिंगची असल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीकांत शिंदे मार्फत मनोज जरांगे यांना 500 पोहोचल्याचा भाजपच्या IT सेलच्या महिला सदस्याकडून या मीटिंगमध्ये दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकी अगोदरची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती समोर येत आहे. (Manoj Jarange And Eknath Shinde)

ऑडिओ क्लिपमध्ये नेमका दावा काय? (Manoj Jarange vs Eknath Shinde)

जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये पोहोच चुके है...

श्रीकांत शिंदे के पाससे पोहोच चुके है...

जरांगे पाटील विधानसभा चुनाव मे हमारे फायदे का रहेगा या...नहीं रहेगा..इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है..

आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही...

मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर नेमका आरोप काय? (Manoj Jarange On Eknath Shinde)

एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत..जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का तुम्ही मला संपवतात याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मी जर उद्या सकाळी बोललो ना मराठ्यांनी 100 रुपये टाका. तर उद्या माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील. लहान विषय नाही शिंदेसाहेब...तुमचा माझा सामना 3 महिन्यानंतर होईल, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला. मात्र एकनाथ शिंदेंनी सगळे आरोप फेटाळले. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावं, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग दूध का दूध पानी का पानी होईल, असे म्हणत जरांगे पाटलांच्या आरोपवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

श्रीकांत शिंदेंमार्फत जरांगेंना 500 कोटी पोहोचले? वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल, VIDEO:

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Eknath Shinde: मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर 500 कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचंही नाव घेतलं, नारायण गडावरुन साहेब-साहेब म्हणत सगळं काढलं!

Read Entire Article